shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्रीमती उर्मिला पवार यांना प्रादेशिक परिवहन अधिकारीपदी पदौन्नती


श्रीरामपूर प्रतिनिधी:
येथील प्रभारी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी तथा अहमदनगर उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीमती उर्मिला पवार यांना प्रादेशिक परिवहन अधिकारी पदी पदोन्नती मिळाल्याने श्रीरामपूर येथील उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात सामाजिक कार्यकर्ते सरताज शेख, फईमभाई शेख,अफजल मेमन आदींनी त्यांचा सत्कार करुन शुभेच्छा व्यक्त केल्या.


श्रीमती पवार यांना अमरावती प्रादेशिक परिवहन कार्यालयात प्रादेशिक परिवहन अधिकारी पदी पदौन्नती मिळाली असल्याचे समजते.


त्यांचा उप प्रादेशिक परिवहन कार्यालय अहमदनगर या ठिकाणी रेग्यूलर चार्ज असताना श्रीरामपूर उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा त्यांच्याकडे दिनांक ०१/०६/२०२२ ते दिनांक ०६/०६ / २०२४ असे आजपावतो दोन वर्षांहून अधिक काळ अतिरिक्त पदभार उत्कृष्टरित्या सांभाळला असल्याने त्यांच्या कार्याची पावती म्हणून त्यांना पदोन्नती मिळाल्याचे बोलले जात आहे.

श्रीरामपूर उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात अनेकांकडून त्यांचा शुभेच्छापर सत्कार करण्यात आला या प्रसंगी सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी सर्वश्री गणेश डगळे,मोटार वाहन निरीक्षक विशाल मोरे, सहायक मोटार वाहन निरीक्षक हेमंत निकुंभ, समोनी राणी सोनवणे, समोनी श्रीमती तळपे, मिलिंद पवार, श्री.माळी, दर्शन सोनवणे, सुनिल शिवरे,अमोल मुंडे,अंकूश भेंडे, विशाल पाटील, नरेंद्र इंजापूरी,रावसाहेब शिंदे,राजु शिंदे,श्री. त्रिमुखे, श्री.सुळ,
सचिन आसमार, अतीक शेख,शाहीद पटेल आदी उपस्थित होते.

*पत्रकार अफजल मेमन, श्रीरामपूर
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
*संकलन*
समता न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर - 9561174111
close