पैठण / प्रतिनिधी
पुणे येथील एस.फोर सोलूशन्स या अग्रगण्य सरकारमान्य प्रकाशन संस्थेकडून २०२४ चा अत्यंत प्रतिष्ठेचा व सन्मानाचा साहित्यरत्न पुरस्कार यंदा पैठण जि.औरंगाबाद येथील कवी तथा लेखक अय्युब पठाण लोहगावकर यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले आहे.
बालभारतीच्या पाठय पुस्तकातील कवी अय्युब पठाण लोहगावकर यांनी मराठी साहित्यक्षेत्रात ३२ वर्षापासून सातत्याने लेखन करून मराठी साहित्य क्षेत्रात भरीव योगदान केल्याबद्दल त्यांना साहित्यरत्न पुरस्कार देण्यात आला आहे. कवी तथा लेखक अय्युब पठाण लोहगावकर यांची आजपर्यंत तेरा पुस्तके त्यामध्ये कवितासंग्रह आणि कथासंग्रह हे प्रकाशीत आहे. भारतातील एस, फोर सोल्यूशन्स या सरकारमान्य अग्रगण्य पुणे येथील प्रकाशन संस्थेने अय्युब पठाण यांच्या मराठी साहित्य क्षेत्रातील लेखन कार्याची दखल घेऊन श्री. अय्युब पठाण यांना साहित्यरत्न या सर्वोच्च पुरस्काराने गौरविण्यात आलेले आहे. अय्युब पठाण यांना साहित्यरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.
*हारुन कासम शेख - पैठण
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर - 9561174111