श्रीरामपूर / प्रतिनिधी
महात्मा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, कर्मवीर अण्णा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदिंनी बहुजन समाजाच्या हाती शिक्षणाचा दिवा दिला. तो ज्ञानप्रकाश झोपडी झोपडीत पाहताना आनंद वाटतो,अशा ज्ञानप्रकाशी गुणवंतांचा सन्मान करण्यातच खरी धन्यता वाटते. त्यासाठी शिक्षण घेण्यासाठी मनाची उत्कटता हवी, कष्टाची तयारी असेल तर गरिबी शिक्षणाच्या आड येत नाही असे विचार स्नेह परिवार ग्रुपचे अध्यक्ष माजी प्राचार्य टी.ई. शेळके यांनी व्यक्त केले.
श्रीरामपूर येथील मार्केट यार्ड पाटाच्या कडेच्या परिसरातील कु. पूनम रवी झुरडे हिने मोठ्या प्रतिकूल परिथितीत १० वी परीक्षेत चांगले यश संपादन करून बोरावके कॉलेज मध्ये ११ वीत प्रवेश घेतला, तिच्या यशाबद्दल तिच्या घरी जाऊन सन्मान करताना प्राचार्य शेळके बोलत होते. वाचन संस्कृती प्रतिष्ठाततर्फे डॉ. बाबुराव उपाध्ये, विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानतर्फे सुखदेव सुकळे, प्राचार्य शेळके यांनी पूनम व तिच्या परिवाराचे कौतुक करून शाल, बुके, पुस्तके, भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. डॉ.उपाध्ये यांनी आपली जीवनकथा सांगून शिक्षण हाच आपला उध्दाराचा मार्ग आहे. कष्ट आणि ज्ञान यांची एकजूट झाली की समाज पुढे येतो मग शिक्षण घेणे सोपे होते. सुकळेसर, शेळकेसाहेब यांनीही खूप कष्टातून शिक्षण घेतले हे सांगून डॉ. उपाध्ये यांनी घरातील सर्वांना शिक्षणाचे मोल सांगितले. यावेळी यशोदा गणपत उंबरेआजी, प्रतिक्षा रवी झुरडे, सुनीता रमेश जाधव, आई अनिता रवी झुरडे, साक्षी झुरडे यांनी सत्काराविषयी आनंद व्यक्त केला.
*ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*
समता न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर -
9561174111