श्रीरामपूर / प्रतिनिधी
येथील महाले पोतदार इंग्लिश स्कूल ची विद्यार्थिनी कु.आर्या भाऊसाहेब लोंढे हिने जनसेवा प्रतिष्ठान अहमदनगर यांचे वतीने घेण्यात आलेल्या डॉ. सी.व्ही रमण राज्यस्तरीय स्कॉलरशिप स्पर्धा परीक्षेत विशेष प्राविण्य संपादन केल्याबद्दल तिची इस्त्रो येथे होणाऱ्या वैज्ञानिक प्रशिक्षणासाठी नुकतीच निवड झालेली आहे.
रयत शिक्षण संस्थेचे डी. डी. काचोळे विद्यालयातील शिक्षक भाऊसाहेब लोंढे व कै.अनिल दिगंबर मुळे शाळेतील शिक्षिका लोंढे मॅम यांची आर्या ही कन्या आहे.
आर्यांच्या निवडीचे मुख्याध्यापक सुनील साळवे, संतोष सोनवणे,रवींद्र निकम, बाळासाहेब रासकर,दत्तात्रय खैरे,नानासाहेब मुठे,आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.
पत्रकार अमोल शिरसाठ
(समन्वयक: पुणे जिल्हा)
स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*
समता न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर - 9561174111