श्रीरामपूर / प्रतिनिधी
येथील महादेव मळा परिसरातील विद्यानिकेतन प्री प्रायमरी इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये संगमनेर येथील जयहिंद चळवळीचे अध्यक्ष, सह्याद्री बहुजन विद्या प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या शुभहस्ते विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानतर्फे राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. राजीव रावसाहेब शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार दि.१० जून २०२४ रोजी सकाळी १० वाजता हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे . थोर शिक्षणतपस्वी, साहित्यिक ॲड.रावसाहेब शिंदे यांच्या ९६ व्या जयंतीनिमित्त होणाऱ्या या सोहळ्यात ॲड. रावसाहेब शिंदे प्रतिष्ठानचे शैक्षणिक कार्य प्रारंभापासून समर्पित भावनेने करणारे प्रतिष्ठानचे कार्यकारिणी चेअरमन माजी प्राचार्य टी.ई. शेळके यांना स्व.ॲड. रावसाहेब शिंदे स्मृती जीवनगौरव पुरस्कार तर मराठी साहित्याचे ज्ञानतपस्वी समीक्षक डॉ. र.बा. मंचरकर स्मृती प्रेरणा पुरस्कार हा २०२४ चा पहिला सन्मान कोपरगांव येथील रयत शिक्षण संस्थेच्या सदगुरु गंगागीरी महाराज महाविद्यालयातील मराठीचे ज्येष्ठ संशोधक, अभ्यासक, मार्गदर्शक प्रा.डॉ. बाबासाहेब शेंडगे यांना देण्यात येणार आहे. या सोहळ्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानचे संस्थापक, सचिव सुखदेव सुकळे, प्रतिष्ठान उपाध्यक्ष, समन्वयक डॉ. बाबुराव उपाध्ये, कोषाध्यक्ष,ट्रस्टी सुयोग बुरकुले, सुदामराव औताडे पाटील आदिंनी केले.
*ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*
समता न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर - 9561174111