श्रीरामपूर / प्रतिनिधी
प्रा.डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी लिहिलेला ग्रामीण विनोदी, सामाजिक, विडंबनात्मक परंतु वास्तवदर्शी समाजप्रबोधक असलेला' माकडांच्या हाती खिचडी' या कथासंग्रहाचे प्रकाशन संपन्न झाले.
श्रीरामपूर येथील बोरावके नगरमधील विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानतर्फे झालेल्या विविध समाजोपयी, सेवाभावी कार्यक्रमात डॉ. उपाध्ये यांच्या' माकडांच्या हाती शाळेची खिचडी' कथासंग्रहाचे अनेक मान्यवरांच्या हप्ते प्रकाशन झाले. प्रतिष्ठानचे संस्थापक, सचिव सुखदेव सुकळे यांनी स्वागत, प्रास्ताविक केले. कथाकार डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी कथासंग्रहाचा उद्देश स्पष्ट केला. यावेळी माजी प्राचार्य टी.ई. शेळके, प्रा.बाबा खरात, प्रा.डॉ. बाबासाहेब शेंडगे, सुदामराव औताडे पाटीलं, पत्रकार प्रकाश कुलथे, प्रा.रामचंद्र राऊत, प्रा.शिवाजीराव बारगळ,आसरा प्रकाशनच्या प्रकाशिका मोहिनी काळे, मंदाकिनी उपाध्ये, डॉ. बाबुराव उपाध्ये, सुखदेव सुकळे यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन संपन्न झाले. डॉ.उपाध्ये यांनी सांगितले की, पुणे येथीलं डॉ. स्नेहल तावरे यांच्या स्नेहवर्धन प्रकाशनतर्फ हा कथासंग्रह गुणवतापूर्ण जाणिवेने प्रकाशित केला असून विनोदी अंगाने अनेक अनुभवसिद्ध प्रसंगापर असलेला हा कथासंग्रह वाचकांना नक्कीच आवडेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. डॉ शिवाजी काळे म्हणाले, समाजातील बऱ्या, वाईट घटना प्रसंगाचेचे प्रतिबिब या कथासंग्रहात आहे. या कथासंग्रहातील १६ कथा वास्तवाचा वेध घेऊन समाज प्रबोधन जाणिवेच्या या कथा आहेत.सौ. मंदाकिनी उपाध्ये यांना अर्पण केलेल्या या कथासंग्रतावर डॉ. स्नेहल तावरे यांनी मलपृष्ठावर लिहिलेला मजकूर कथासंग्रहाचे सारसर्व सांगणारे असल्याचे मत प्राचार्य शेळके यांनी व्यक्त केले. उपस्थित मान्यवरांनी या कथासंग्रहाविषयी मनोगत व्यक्त केले. डॉ. उपाध्ये यांच्या साहित्यिक कार्याचे कौतुक केले. संजय बुरकुले, सुरेखा बुरकुले, संकेत बुरकुले, सुयोग बुरकुले यांनी नियोजन केले संगीता फासाटे यांनी सूत्रसंचालन केले तर मोहिनी काळे यांनी आभार मानले.
*ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*
समता न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर -
9561174111