shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कमलेश नवले यांना साहित्यरत्न पुरस्कार जाहीर ...


नेवासा : दि . ८ /   जीवन ज्योत फाऊंडेशन चे संस्थापक कमलेश बाबासाहेब नवले यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन सन २०२४ चा एस फोर सोल्यूशन्स संस्था महाराष्ट्र राज्य च्या वतीने साहित्यरत्न पुरस्कार दिला असून ते नेवासा तालुक्यातील सौंदाळा येथील रहिवासी आहेत.

मागील वर्षापासून सातत्याने लेखन करून मराठी साहित्य क्षेत्रात भरीव योगदान केल्याबद्दल त्यांना साहित्यरत्न पुरस्कार देण्यात आला आहे.

एस फोर सोल्यूशन्स संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दिला जाणारा साहित्यरत्न पुरस्काराची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे.अशी माहिती एस् फोर सोल्यूशन्स संस्था च्या पदाधिकारी यांनी दिली आहे.लेखक कमलेश नवले पाटील यांनी जीवन ज्योत फाऊंडेशन च्या सर्व पदाधिकारी व एस फोर सोल्यूशन्स संस्था महाराष्ट्र राज्य चे संचालक मंडळाचे आभार मानले आहे. 

कमलेश नवले यांना मिळालेल्या साहित्यरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल तालुक्यातून राजकिय सामाजिक सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
close