श्रीरामपूर / प्रतिनिधी
श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील कवी बाबासाहेब पवार यांचे बुधवार दि.१२ जून २०२४ रोजी सकाळी ८.४० वाजता आकाशवाणीच्या अहमदनगर केंद्रावरून साहित्य सौरभ या कार्यक्रमात कविता वाचन प्रसारित होणार आहे. यापूर्वीही कवी पवार यांचे आकाशवाणीवर कविता व गीतांचे अनेक कार्यक्रम प्रसारित झालेले आहे,
पवार यांचे "ती सांज" असे कवितासंग्रह प्रकाशित आहे, दरवर्षी काव्य सरिता या दिवाळी अंकाचे ते संपादन करत असतात, त्यांना महाराष्ट्रातून अनेक संस्थेच्या वतीने पुरस्कार मिळालेले आहेत महाराष्ट्रभर कवी संमेलन साहित्य संमेलनात त्यांनी आपली कविता रसिकापर्यंत पोहोचवली आहे, त्यांचे युट्युब वरती अनेक गाणे प्रकाशित आहे, त्यांच्या या कार्यक्रमाबद्दल चित्रपट निर्माते रमेश जेठे, भाऊसाहेब धोंडगे, राजेंद्र देसाई, विजुभाऊ राठोड,संजय वैरागर,लहान भाऊ खरात, गणेश गायकवाड आदींनी अभिनंदन केले आहे.
*पत्रकार राजेंद्र देसाई - वडाळा महादेव
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ *संकलन
समता न्यूज नेटवर्क श्रीरामपूर - 9561174111