श्रीरामपूर / प्रतिनिधी
श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगांव येथील ॲड. प्रमोद सगळगिळे व जाधव यांच्या ऊसाच्या शेतात रात्री ८ वाजता बिबट्याने दर्शन दिले, अनेक दिवसांपासुन परिसरातील अनेक पाळीव कुत्रे सदर बिबटयांने फस्त केले आहे तसेच दुचाकी स्वारांवर हल्ला, शेळी बोकडाचा फडशा अशा अनेक घटना परीसरात घडल्या आहेत.सदरचा वर्दळीचा रस्ता असल्याने अनेक नागरीकांची ये - जा याच रस्त्याने होत असते यामुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
बिबटया आता मानवी वस्तींकडे संचार करू लागला आहे, परिसरातील नागरिकांनी फटाके वाजवून त्याला पिटाळून लावण्याचा प्रयत्न केला.
तरी पुढील काही अनर्थ अथवा अप्रिय घटना घडण्यापूर्वी वनविभागाने सदर बिबट्याचा त्वरीत बंदोबस्त करावा अशी मागणी ॲड. प्रमोद सगळगिळे तसेच परिसरातील नागरिकांनी केली आहे.
*पत्रकार राजेंद्र देसाई - वडाळा महादेव
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*
समता न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर - 9561174111