*संगमनेरमध्ये विविध सामाजिक संस्था, संघटनांचे पोलिस व महसूल प्रशासनास निवेदन
संगमनेर / प्रतिनिधी:
कोल्हापूर जिल्ह्यातील विशालगडावरील अतिक्रमणाच्या नावाखाली झालेला हिंसाचार तसेच ठाणे जिल्ह्यातील शिळफाटा परीसरात एका मंदिरात महिलेवर अत्याचार करुन करण्यात आलेल्या तीच्या निर्घूण हत्या प्रकरणी आरोपींना कठोर शासन व्हावे याकरीता संगमनेरमधे विविध सामाजिक संस्था संघटना एकवटल्या असून
यातील आरोपींना कठोरातील कठोर शासन होणेकामी पोलिस व महसूल प्रशासनास निवेदन देण्यात आले आहे.
सदर निवेदनात असे म्हंटले आहे की, आम्ही संविधान प्रेमी तथा या भारताचे नागरिक तसेच ह्युमन इनोवेशन ऑर्गनायझेशन सर्वांसाठी मानवाधिकार सामाजिक संस्थेच्या माध्यमातून व मुस्लिम समाजसह इतरही धर्मीय आपणास नम्रपणे निवेदन सादर करतो की, दिनांक १४/०७/२०२४ रोजी दुपारी कोल्हापूर जिल्ह्यातील विशालगड या ठिकाणी अतिक्रमण काढण्याच्या नावाखाली काही समाजकंटकांच्या जमावाने त्याच ठिकाणाहून सात ते आठ किलोमीटर अंतरावरील असलेल्या गजापुर गावातील स्थानिक नागरिकांच्या घरावर तलवारी, काठ्या,कोयते, असली घातक शस्त्र घेऊन विशिष्ट समाजातील लोकांच्या घराची मोडतोड केली व वाहनांची जाळपोळ देखील केलेली आहे. त्याचप्रमाणे धार्मिक स्थळांची देखील विटंबना केली गेली या हिंसाचारात महिला व लहान मुले, वयोवृद्ध महिला व पुरुष या हल्ल्यातून बचावलेले नाहीत, त्यांना देखील जबर मारहाण करण्यात आलेली आहे,
तसेच बंदोबस्तासाठी सज्ज असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना देखील तलवारीने वार करून जखमी करण्यात आलेले आहे, सदरचा कायदा हातात घेऊन नागरिक वस्तीवर हंल्ले करून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या या गुंड प्रवृत्तीच्या समाजकंटकांचा समस्त मानव जाहीर निषेध करत आहोत, तसेच या सर्व समाजकंटकांवर कुठल्याही नेता, पुढाऱ्याचा पदाचा मुलाहिजा न ठेवता शक्य तितक्या लवकर योग्य चौकशी करुन अशा समाजकंटकांवर कठोरात कठोर कारवाई करावी, यासोबतच या हिंसाचारात ज्या कुणाचे आर्थिक व संसारोपयोगी वस्तूंची नासधूस नुकसान झाली आहे त्यांना तात्काळ शासकीय मदत मिळून देत सदर ठिकाणची पुन्हा जैसे थे परिस्थिती निर्माण करावी, सदर निवेदनात पुढे असेही नमुद करण्यात आले आहे की, आम्ही किंवा आमचे निवेदन हे कुठल्याही अतिक्रमणाचे किंवा अतिक्रमण धारकांचे समर्थन करत नाही. गडकिल्ल्यांच्या नावाखाली गैरकृत्य करणाऱ्या तथा दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांच्या विरोधात आहे,
तसेच ठाणे जिल्ह्यातील शिळफाटा परिसरात गणेश मंदिरामधे आसरा घेण्यासाठी गेलेल्या महिलेवर मंदिरातील पुजारी व त्याच्या साथीदारांनी तीच्यावर अत्याचार करत केलेली हत्या अश्या समाजविघातक आरोपींना कठोर शासन व्हावे, अश्या आशयाचे निवेदन संगमनेर शहर व तालुक्यातील विविध समाज बांधव तथा ह्यूमन इनोवेशन ऑर्गनायझेशन सर्वांसाठी मानवाधिकार,एकता सेवाभावी सामाजिक संस्थेच्यावतीने उपविभागीय पोलीस अधिकारी तथा उपविभागीय प्रांताधिकारी यांना देण्यात आले.
या प्रसंगी माजी नगरसेवक डॉ दानिश खान,सामाजिक कार्यकर्ते राजूभाई इनामदार, एकता सेवाभावी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आसिफभाई शेख, सामाजिक तथा काँग्रेसचे कार्यकर्ते मुजाहिद पठाण,तौसीफ अली मणियार, हाफिज हमजा, मुस्लिम समाजातर्फे मुफ्ती सालीम साहब,ह. सय्यद बाबा उरूस कमिटीचे अध्यक्ष अन्सार सय्यद,वंचित बहुजन आघाडीचे माजी शहराध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते अजिजभाई ओहरा,अंजुम शेख, नूर शेख, ह्युमन इनोवेशन ऑर्गनायझेशन सर्वांसाठी मानवाधिकारच्या महिला पदाधिकारी जिल्हा अध्यक्षा बानोबी शेख, तालुका अध्यक्षा सविता भालेराव, शहर अध्यक्षा आरती सोनवणे, जिल्हा अध्यक्ष पत्रकार शौकत पठाण, महासचिव जमीर शेख,आदी उपस्थित होते.
*वृत्त विशेष सहयोग
पत्रकार शौकत पठाण - संगमनेर