अहमदनगर जिमाका वृत्तसेवा:
महाराष्ट्र सरकारने २३ मे  २०२३ रोजी रोजगार हमी योजनेच्या हजेरी सहाय्यकांना लाभ देण्याचे आदेश दिले आहेत. परंतु, काही हजेरी सहाय्यकांना अद्याप हे लाभ देणे प्रलंबित आहे. यामुळे हजेरी सहायक कर्मचारी संघटनेने महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिवांविरुद्ध मा. सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील काही हजेरी सहायकांचे कोणत्याही प्रकारचे अभिलेख उपलब्ध नसल्यामुळे त्यांना लाभ देण्याचे प्रलंबित आहे. त्यांनी त्यांच्या सेवानिवृत्त कार्यालयाशी किंवा जिल्हाधिकारी कार्यालयातील रोजगार हमी योजना शाखेशी तात्काळ संपर्क साधावा. असे आवाहन उपजिल्हाधिकारी (रोहयो) रामदास जगताप  यांनी प्रसिध्दी  पत्रकान्वये  केले आहे.
लाभासाठी संपर्क साधावयाचे हजेरी सहायक - रामनाथ शिवम बिन्नर, नवनाथ उमाजी गावडे, दत्तात्रय आसाराम शिवारे, आण्णासाहेब लक्ष्मण थोरात, सहदेव कारभारी आंधळे, आजिनाथ ज्ञानोबा दगडे, परहार गेणा बापू,  सुभाष केशवराव देशपांडे,  जगन्नाथ सुर्यभान मरुद, आश्रुबा लक्ष्मण नेहेरकर या प्रमाणे नावे असल्याचे उपजिल्हाधिकारी (रोहयो) यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
 *वृत्त विशेष सहयोग
पत्रकार रमेश जेठे (सर) अहमदनगर 
*सहयोगी:* स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
*संकलन:* समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - 9561174111

 
 
 
 
 
 
