पुणे / प्रतिनिधी:
भूमी फाउंडेशन,महाराष्ट्र राज्य सामाजिक संस्था गेल्या अनेक वर्षापासून शैक्षणिक क्षेत्र,सामाजिक क्षेत्र,ग्रामीण भाग विकास,विधवा निराधार महिला,अनाथ निराधार मुली-मुलं,युवा रोजगार मेळावा,आपत्तीच्या काळात अत्यावश्यक मदत इत्यादीं करिता संस्थापक अध्यक्ष कैलास पवार आणि असंख्य सेवाभावी लोकांच्या सहकार्याने लोक सहभागातून जन सर्वांगीण विकासाद्वारे अविरत स्वरूपाचे भरीव असे योगदान देत आहे.हे कार्य निश्चित गौरवास्पद असून अशा संस्थांना विविध स्तरातून मोठे बळ मिळणे अत्यंत गरजेचे आहे असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्र- कुलगुरू डॉ.पराग काळकर यांच्या मातोश्री थोर साहित्यिका, लेखिका प्रा. डॉ.शैला काळकर यांनी व्यक्त केले. भूमी फाउंडेशन सामाजिक संस्थेचे सावित्रीबाई मुलींचे निवासी वसतिगृह वाघोली (पुणे) येथे डॉ.शैला काळकर यांनी सदिच्छा भेट दिली.
यावेळी प्रा.डॉ.काळकर यांनी उपस्थित निवासी मुलींची सकारात्मकपणे परिस्थिती जाणून घेत त्याचबरोबर मुलींना मार्गदर्शन केले. आजच्या परिस्थितीनुसार सामाजिक कार्य हाती घेणे म्हणजे हे तारेवरची कसरत आहे. त्यात प्रामुख्याने मुलींसाठी जबाबदारी घेणे यासाठी फार कमी लोक धाडस करतात. त्यापैकी कैलास पवार हे एक धाडसी व्यक्तिमत्व म्हणावे लागेल. मुळात लहान वयातच पितृछत्र हरपल्याने अंगावर पडलेल्या संपूर्ण जबाबदारीतून समाजातील असंख्य विविध प्रश्न हाताळण्याचे कौशल्य बालवयात कैलास पवार यांना प्राप्त झाल्यामुळेच एवढी मोठी जबाबदारी स्वीकारण्याच धाडस होणे हे त्यातले मुख्य कारण असावे असे डॉ.काळकर यांनी सांगितले.
यावेळी सौ.अनिताताई कैलास पवार यांनी स्वागत केले तर प्रा.जयश्रीताई वाळके यांनी डॉ.काळकर यांचा सन्मान केला. याप्रसंगी धनराज वाळके,अशोक भाऊ घायल पाटील विलास पवार प्रिया पवार,मंदाबाई पवार, भाऊसाहेब कुरकुटे,सुवर्णा कुरकुटे,आशाताई तांगडे तसेच इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*वृत्त विशेष सहयोग
ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव
*राज्य प्रसिद्ध प्रमुख
भूमि फाऊंडेशन महाराष्ट्र
*सहयोगी:* स्वाभिमानी संपादक सेवा ऊ
*संकलन*
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - 9561174111