shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

बेलापूर महाविद्यालयात वाड्.मय, वाणिज्य, सांस्कृतिक मंडळाचे उद्घाटन व वेलकम प्रोग्राम संपन्न


श्रीरामपूर / प्रतिनिधी:
श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात नुकतेच वाड्.मय, वाणिज्य व सांस्कृतिक मंडळाचे उद्घाटन तसेच वेलकम प्रोग्राम संपन्न झाला. यावेळी बेलापूर एज्युकेशन सोसायटीचे सचिव ऍड. शरद सोमाणी विचारपीठावर अध्यक्ष म्हणून उपस्थित होते.श्रीरामपूर शहर पोलिस विभागाचे एपीआय सुरेश आव्हाड,एएसआय सुधीर हापसे ,विश्वस्त चंद्रशेखर डावरे,ऍड.विजय साळुंके, शिक्षक प्रतिनिधी प्रा. नामदेव मोरगे,सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.विठ्ठल सदाफुले, वाणिज्य विभाग प्रमुख प्रा.प्रकाश देशपांडे, वाणिज्य मंडळाचे अध्यक्ष डॉ.अशोक माने,वाड्.मय मंडळाचे डॉ.मनोज तेलोरे उपस्थित होते. 

यावेळी सचिव ऍड. शरद सोमाणी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, कविता ,कथा, नाटक , लेख,चारोळ्या , वाणिज्यविषयक लेख लिहिले पाहिजेत.वाचन वाढविले पाहिजे. महाविद्यालयात नियमितपणे तास करुन ग्रंथालयाचा उपयोग करावा.आपल्याकडे बीबीए,बीसीए कोर्सेस नव्याने चालू झाले आहेत. त्याचा विद्यार्थ्यांनी करिअरसाठी उपयोग करुन घ्यावा असे ते म्हणाले.
विश्वस्त ऍड.विजय साळुंके म्हणाले की, विद्यार्थ्यांनी कायद्याची पुस्तके वाचावीत, आपल्या भारताचे संविधान वाचावे आणि जबाबदार नागरिक बनावे.बिल्वदल भित्तीपत्रकात व हरिहर नियतकालिकात सातत्याने लेखन करावे म्हणजे तुम्ही लेखक विचारवंत व्हाल असे मत त्यांनी व्यक्त केले. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. गुंफा कोकाटे यांनी महाविद्यालयातील विविध समित्यांची, विभागांची व महाविद्यालयीन शिस्तीबाबत माहिती देऊन विद्यार्थ्यांचे पुस्तक व पेन देऊन वेलकम केले.या कार्यक्रमात मीनल शेलार व श्रुती सराफ यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सुवर्णपदक प्राप्त केल्याबद्दल सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक माने यांनी केले.प्रास्ताविक डॉ.मनोज तेलोरे यांनी तर प्रा.प्रकाश देशपांडे यांनी आभार मानले. 
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*पत्रकार अमन सय्यद - बेलापूर
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - 9561174111
close