shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

जुगार व मटका चालक, मालकांवर कायदेशीर कारवाई करत त्यांना हद्दपार करा - बाबासाहेब शिंदे


श्रीरामपूर शहरातील अवैध व्यावसायाविरुद्ध मनसेचे गांधी पुतळ्यासमोर उपोषण सुरु 

श्रीरामपूर / प्रतिनिधी:
 शहरात मटका (आकडे) व पत्त्याचे (जुगार) क्लब चालवणाऱ्या चालक/ मालक लोकांवर कायदेशीर कारवाई करून त्यांना त्वरित नगर जिल्ह्यातून तडीपार करण्यात यावी असे मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
श्रीरामपूर शहर हद्दीतील मटका व पत्त्याचे क्लब चालवणाऱ्या लोकांवर कायदेशीर कारवाई करून त्यांना त्वरित नगर जिल्ह्यातून तडीपार करण्यात यावे, चिरीमिरी घेऊन यांना सहकार्य करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर देखील निलंबनाची कारवाई करण्यात यावी यासाठी श्रीरामपूर येथील महात्मा गांधी पुतळा समोर मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे, तालुकाध्यक्ष डॉक्टर संजय नवथर, शहर अध्यक्ष सतीश कुदळे, मनसे शेतकरी सेना तालुकाध्यक्ष अमोल साबणे, मनसे रोजगार सेना तालुकाध्यक्ष नितीन जाधव, आदि उपोषणाला बसले आहेत.

याप्रसंगी मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे पुढे म्हणाले की,श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन हद्दीत म्हणजेच श्रीरामपूर शहरातील मिल्लतनगर येथे मोठ्या प्रमाणात पत्याचे क्लब चालू आहे. तसेच वार्ड नं. १, ते वार्ड नं. ७ या प्रत्येक वार्डामध्ये व बेलापूर गावामध्ये व आजुबाजुतील गावांतमध्ये देखील सर्रासपणे
चालू आहे,श्रीरामपूर शहरातील प्रत्येक गल्ली -बोळांमध्ये खुलेआमपणाने राजरोसपणे टपर्‍यांमध्ये मुंबई,कल्याण नावाने व इतर नावाने विविध आकडे लावून घेणाऱ्या पंटरांकरवी मटका (आकडे)  राजरोसपणे चालू आहे, या पत्याच्या क्लब मध्ये व मटका (आकडे) खेळायला येणाऱ्या लोकांना जास्त पैसे कमवून लवकर श्रीमंत व्हाल असे अमिषे दाखवुन आकड्यावर पैसे खेळण्यास भाग पाडुन हजारो लोकांना बरबाद करुन त्याचे घरे उद्ध्वस्त करुन अनेक लोकांना भिकेला लावण्याचे महापाप पत्याचे क्लब चालक मालक व मटका (आकडे) चालक मालक करत असल्याने त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करुन त्यांना त्वरती नगर जिल्ह्यातुन तडीपार करण्यात यावे. कारण की ते जर श्रीरामपूर तालुक्यात किंवा नगर जिल्ह्यात राहिल्यास त्यांचा हा अवैध्य व्यवसाय  चालूच राहील म्हणनू या लोकांवर त्वरित कायदेशीर कारवाई करून या लोकांवर पोलिसांचा वचक तयार करावे, कारण की पत्याचा क्लब मालक व मटका चालक हे लोकांना सांगतात की आम्ही दोन पोलीस कर्मचार्‍यांच्या माध्यमातून श्रीरामपूर शहर पोलीस निरिक्षक व त्यांचे वरिष्ठ सर्व अधिकाऱ्यांना हप्ते देतो. 

त्यामुळे आमच्यावर कोणतीच कारवाई होऊ  शकत नाही व कोणी आमच्या विरोधात आवाज उठवले तर त्यांना संपून टाकू, कारण आमच्याकडे विविध गुन्ह्यातील सराईत गुन्हेगार आहेत व या गुन्हेगारांना पण आम्ही पैसे देऊन मदत करत असतो आणि जे गुंडागर्दीला घाबरणार नाही अशा लोकांना खोट्या गुन्ह्यात अडकवून टाकू असे अनेकांना खाजगी मध्ये सांगितले जाते. त्यामुळे आमच्या जिवाचे काही बरे वाईट झाले तर पत्याचा क्लब मालक व मटका (आकडे) मालक यांना सहकार्य करणारे ते दोन पोलीस कर्मचारी जबाबदार राहातील याची आपण गंभीर्याने नोंद घ्यावी असे म्हटले आहे.
कारण अनेक लोकांनी सांगितले की विविध गुन्ह्यातील आरोपींना सोडवण्यासाठी ते रोजच पोलीस स्टेशनमध्ये असतात, अनेक आरोपींना पोलीस स्टेशन मधून हे सोडून घेऊन जातात, त्यामुळे विविध गुन्ह्यातील आरोपींबरोबर या लोकांचे हितसंबंध आहेत असे अनेकांनी आम्हाला सांगितले असल्याचे ते म्हणाले.तसेच श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनमधील ते दोन पोलीस कर्मचारी आहेत जे मटका (आकडे) पत्याचे क्लब व इतर अवैध धंदे चालवणार्‍या लोकांनकडनू पोलीस अधिकारी मॅनेज करुन देतो म्हणनू हप्ते घेतात व अवैध धंदे करणाऱ्या लोकांना मदत करतात. अशा हप्तेखोर पोलीस कर्मचाऱ्यांमुळे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी बदनाम होत आहे,त्या दोन भ्रष्ट पोलिस कर्मचार्‍यांचे मोबाईलची तपासणी करण्यात यावी. म्हणजे लक्षात येईल की पोलिस कर्मचारी कोण कोणत्या अवैध धंदे करणार्‍या लोकांच्या संपर्कात आहेत. तसेच कोण कोणत्या गुन्हेगाराला चिरीमिरी घेऊन मदत करतात हे सत्य देखील समोर येईल. काही दिवसापूर्वी कोल्हार-  बाभळेश्वर रोडवरील अवैध धंदे करून दादागिरी करून दहशत पसरविण्याचे काम करणाऱ्या मटका पत्त्याचे क्लब चालकांचे सगळे धंदे बंद झाले,तिकडे बंद होऊ शकते तर श्रीरामपूर शहरांमध्ये का होऊ शकत नाही ?,असा सवाल तमाम श्रीरामपूरकरांना पडलेला आहे श्रीरामपूर शहरात वाढलेली गुन्हेगारी या अवैध रीतीने व्यवसाय करणाऱ्या लोकांमुळेच आहेत पोलिसांनी अवध्य रीतीने व्यवसाय करणारे लोकांवर कारवाई करून श्रीरामपूरकरांना विश्वास मिळवून द्यावा की पोलीस गुन्हेगारांच्या बाजूने नाहीतर गुन्हेगारी संपून नागरिकांना सुरक्षा देण्यासाठी असतात, परंतु लोकांना श्रीरामपूर शहर सुरक्षित वाटत नसल्याने व या अवैध रीतीने चालणाऱ्या व्यवसायाकडून नागरिकांना त्रास होत असल्याने आम्ही २९/६/२०२४ रोजी अप्पर पोलीस अधिक्षक, उपविभागीय पोलिस अधिकारी, पोलीस निरिक्षक, यांना निवेदन देऊन कार्यवाही करण्यातयावी अशी विनंती केली होती परंतु आमच्या निवेदनाची दखल न घेतल्याने आम्ही दिनंक ९/७/२०२४ रोजी सकाळी 11 वाजता श्रीरामपूर येथील गांधी पुतळ्यासमोर उपोषणास बसलो आहे 

 जोपर्यंत गोरगरिब जनतेच्या आर्थिक फसवणूक करणाऱ्या  पत्याचे क्लब मालक व मटका (आकडे)मालक यांच्या विरुद्ध कायदेशीर कार्यवाही करुन त्यांना नगर जिल्ह्यातुन तडीपार करणार नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही व जर दोन ते तीन दिवसांमध्ये आमच्या उपोषणाची दखल न घेतल्यास नगर जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते संपूर्ण जिल्ह्यामध्ये विविध स्वरूपाचे तीव्र आंदोलन करतील मग होणाऱ्या परिणाम संबंधित पोलीस प्रशासनच जबाबदार राहील याची नोंद घ्यावी असे मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे यावेळी म्हणाले.
 याप्रसंगी प्रविण रोकडे जिल्हा संघटक विलास पाटणी उपजिल्हाध्यक्ष डॉ. संजय नवथर तालुकाध्यक्ष सतिष कुदळे शहराध्यक्ष गणेश दिवसे तालुकाध्यक्ष मनसे सहकार सेना नितीन जाधव तालुकाध्यक्ष मनसे रोजगार सेना अमोल साबणे तालुकाध्यक्ष मनसे शेतकरी सेना निलेश सोनवणे तालुकाध्यक्ष मनसे रस्ते आस्थापना प्रशांत गमले, संकेत शेलार,अतुल खरात, दीपक सोनवणे,राजीव जगताप, अक्षय काळे, सुरेश शिंदे, चेतन कांबळे, रवी शिंदे, रामा शिंदे, दीपक शिंदे, संदीप विशंभर, प्रमोद उंद्रे, विनोद शिरसाट, सुमित चौधरी, फिरोज सय्यद, अधिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
close