श्रीरामपूर / प्रतिनिधी:
श्रीरामपूर नगरपालिका शाळा क्र. ३ या ठिकाणी आषाढी एकादशीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, याप्रसंगी शालेय विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांच्या तसेच विठ्ठल रुखमाई यांची वेशभूषा परिधान करून नगर पालिकेच्या शाळा क्र.३ पासुन मोठ्या उत्साहात  आषाढी एकादशीच्या दिंडी निमित्ताने वृक्षदिंडी तसेच झाडे लावा झाडे जगवा असा संदेश दिला, विठ्ठल-रुख्मिणी बनलेल्या बालवारकऱ्यांची मुख्याध्यापिका स्मिता गायकवाड यांच्या हस्ते पुजन करण्यात आले,सुजाता व श्रेयस शिंदे या बालवारकऱ्यांनी विठ्ठल रखुमाईची वेशभुषा धारण करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सर्व मुला-मुलींनी वारकऱ्यांची वेशभूषा परिधान करून डोक्यावर तुलसी वृंदावन वृक्ष हातात वीणा, टाळ, गळ्यात तुलसीच्या माळा घालत विठ्ठलनामाचा जयघोष केला. याप्रसंगी दिंडीत  विठ्ठलनामाचा जयघोष करणाऱ्या गीतांनी परिसर भक्तिमय झाला,महादेव मंदिरात दिंडीचा समारोप झाला, मुलांना केळी, खिचडी प्रसाद वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापिका स्मिता गायकवाड, राजेंद्र गायकवाड, प्राची लोळगे, सचिन डोखे, पल्लवी बोरुडे आदी शिक्षक / शिक्षिका कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशिल होते. बाल चिमुकले विद्यार्थी तसेच पालक वर्गातून आनंद व्यक्त करण्यात आला. उपस्थित सर्वांचे मुख्याध्यापिका स्मिता गायकवाड यांनी आभार मानले.
*वृत्त विशेष सहयोग*
पत्रकार राजेंद्र देसाई - वडाळा महादेव 
सहयोगी: स्वाभिमानी संपादक सेवा संघ, 
संकलन: समता न्यूज सर्व्हिसेस श्रीरामपूर - ९५६११७४१११

