स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत भारतीय जैन संघटना इंदापूरच्या वतीने १ हजार वह्या व एक हजार पेनचे वाटप.इंदापूर येथील जिल्हा परिषद शाळा नंबर १ व २ येथील विद्यार्थ्यांना केले वाटप.
इंदापूर: स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत सामाजिक जाणीवेतून भारतीय जैन संघटना इंदापूरच्या वतीने १ हजार वह्या व एक हजार पेनचे वाटप इंदापूर येथील जिल्हा परिषद शाळा नंबर १ व २ मध्ये विद्यार्थ्यांना करण्यात आले .
यावेळी भारतीय जैन संघटनेचे तालुका अध्यक्ष नरेंद्र गांधी, धरमचंद लोढा, प्रकाश बलदोटा ,महेंद्र गुंदेचा, पारसमल बागरेचा इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धरमचंद लोढा यांनी केले