प्रतिनिधी मोहन शेगर, सोनई
घोडेगाव, श्री स्वामी समर्थ शिक्षण प्रसारक मंडळ संचालित महात्मा फुले बालसंगोपनकेंद्र घोडेगाव आयोजित 15 ऑगस्ट 2024 भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महात्मा फुले बालसंगोपन केंद्राचा अध्यक्ष व संस्थापक काशिनाथ चौगुले यांच्या मातोश्री सोनाबाई चौगुले यांनी भूषवले. प्रमुख उपस्थिती म्हणून नेवासा पंचायत समितीच्या सभापती सुनीताताई गडाख, मा सरपंच बाळासाहेब सोनवणे, तसेच क्रीडा, कला, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रातील इतर मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात संविधान उद्देशिकेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर आलेल्या सर्व मान्यवरांचा सत्कार समारंभ करण्यात आला. महात्मा फुले बालसंगोपन केंद्राचे संस्थापक अध्यक्ष काशिनाथ चौगुले यांनी प्रास्ताविक सादर केले आणि प्रास्ताविकेमध्ये गेल्या तीन वर्षापासून चालवत असलेल्या बालसंगोपन केंद्राच्या सर्व प्रकारचा कामाचा आढावा घेतला. हे संपूर्ण चालू असलेले काम दानशूर देणगीदारांच्या माध्यमातून चालू आहे . तसेच समाजातील अनेक नागरिक वाढदिवस ,पुण्यतिथी अशा प्रकारचे कार्यक्रम स्वतः येऊन बालसंगोपन केंद्रात साजरे करतात.
पंचायत समिती मा सभापती सौ. सुनीताताई गडाख बोलताना म्हणाल्या की हे काम सामान्य कुटुंबातील व्यक्तीसाठी चालवणे सोपी गोष्ट नाही. आज आपल्या घरामध्ये दोन मुलं सांभाळायचे असेल किती अडचणी येतात. हे आपल्याला माहित आहे. या बालसंगोपन केंद्रात गेल्या तीन वर्षापासून जे 52 विद्यार्थी घडत आहे. खरोखरच हे काम खूप छान आहे . गडाख कुटुंबाच्या वतीने या बाल संगोपन केंद्रास कायम मदत राहील असे आश्वासन दिले. त्यानंतर गडाख कुटुंबाच्या वतीने काशिनाथ चौगुले यांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय साळवे यांनी केले तर आलेल्या सर्व मान्यवरांचे आभार सागर शिंदे यांनी मानले सदरील कार्यक्रमास टायगर ग्रुप नेवासा तालुका अध्यक्ष बाबा भाऊ शिंदे, शाखा अध्यक्ष आबा सावंत, चिराऊ फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष रेणुका विधाटे, शिवाजी शेगर , भगवान शेगर, विठ्ठल शेगर, सुरेश शिंदे, तानाजी चव्हाण, श्रीगोंदा मनसे तालुकाध्यक्ष भरत शिंदे, सामाजिक कार्यकर्ते रमेश सावंत, नितीन सावंत, पंकज शिंदे, सामाजिक कार्यकर्ते , नवनाथ वैरागर, किशोर कदम, राजू साळवे, अभय काळे व महात्मा फुले बाल संगोपन केंद्रावर प्रेम करणारे सर्व सभासद तसेच विविध क्षेत्रातील इतर मान्यवर उपस्थित होते.

