shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पर्यावरण पूरक राखी प्रदर्शन आणि सुंदर हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन


शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)
 सामाजिक बातमी

विद्या प्रसरिणी सभेच्या व्ही. पी. एस हायस्कूल व द.पू. मेहता कनिष्ठ महाविद्यालया मध्ये आनंददायी शनिवार उप्रक्रमा अंतर्गत पर्यावरण पूरक राख्या बनवणे आणि हस्ताक्षर स्पर्धा घेण्यात आली.

पर्यावरणातील वस्तू जमाकरून विद्यार्थ्यांनी सुंदर राख्या तयार केल्या. तसेच इयत्ता पाचवी ते सातवी मधील विद्यार्थ्यांची विद्यालयाच्या प्रकाश हॉल मध्ये सुंदर स्पर्धेचे आयोजन हस्ताक्षर करण्यात आले.

प्रशालेचे प्राचार्य श्री. उदय महिंद्रकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरील स्पर्धा पार पडल्या. विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षकांसाठी राखी प्रदर्शन भरवण्यात आले.

प्रदर्शनाला प्राचार्य श्री. उदय महिंद्रकर, पर्यवेक्षक श्री. विजय रसाळ, श्री. श्रीनिवास गजेंद्रगडकर, पर्यवेक्षिका श्रीमती क्षमा देशपांडे, श्री. संजय पालवे, शिक्षक प्रतिनिधी श्रीमती ज्योती डामसे, शिक्षकेतर प्रतिनिधी श्रीमती संजीवनी आंबेकर, दिपाली मावकर (हॉटेल मॅनेजमेंटच्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर) यांनी भेट दिली.

राखी प्रदर्शनाचे नियोजन कला शिक्षक श्री. योगेश कोठावदे यांनी केले. तर सुंदर हस्ताक्षर स्पर्धेचे नियोजन श्रीमती सविता सिंग आणि श्रीमती नंदा देसाई आणि सहकाऱ्यांनी केले.

उपक्रमाचे नियामक मंडळ अध्यक्षा डॉ. मृणालिनी गरवारे, कार्यवाह डॉ. सतीश गवळी सहकार्यवाह श्री. विजयजी भुरके आणि नियामक मंडळ सदस्य तथा शाळा समिती अध्यक्ष श्री. भगवानभाऊ आंबेकर यांनी कौतुक केले.
close