shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

हर्षवर्धन पाटील यांच्या योगदानातूनच पळसदेव सारख्या ग्रामीण भागात दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण - भूषण काळे.


पळसदेव    (. आप्पा यमपुरे)    : 
माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी विद्यालयासाठी नेहमीच भौतिक सुविधा इमारत निधी, विद्यार्थी विकास योजनेच्या माध्यमातून भरीव मदत केलेली आहे. त्यांच्या योगदानातूनच पळसदेव सारख्या ग्रामीण भागात दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचे काम शिक्षण संस्था करीत आहे. दरवर्षी भाऊंच्या वाढदिवसानिमित्त विद्यालयात वृक्षारोपण शालेय साहित्य खाऊ वाटप रक्तदान शिबिरासारखे उपक्रम राबवले जातात असे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष तथा कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे संचालक भूषण काळे यांनी दि.21 राष्ट्रीय साखर महासंघ तथा महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार व संसदीय कामकाज मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पळसदेव  येथील पळसनाथ विद्यालयात विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी आपल्या भाषणातून  केले.
यावेळी श्री.पळसनाथ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष भूषण काळे, सचिव योगीराज काळे ,खजिनदार बबन काळे, पळसदेव चे सरपंच अंकुश जाधव, माजी सरपंच आजिनाथ पवार, महेंद्र काळे, स्वप्निल काळे,मल्हारी काळे, विकास शिंदे, प्राचार्य विकास पाठक,  पर्यवेक्षक संजय जाधव,सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी आदीसह प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी उपस्थित होते.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष भूषण काळे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून श्री.पळसनाथ पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्यालयात विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले. 
श्री.पळसनाथ शिक्षण प्रसारक मंडळ, पळसदेव ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्र, यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यालयात विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. 
विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या मनामध्ये वृक्षारोपण व त्याचे फायदे पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी झाडांचे महत्त्व सांगून वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला. 


close