शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृतसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे
शनिवार १७ ऑगस्ट २०२४
अहमदनगर आकाशवाणीचा लोकप्रिय कार्यक्रम
नगरी नगरी पुन्हा सुरु करा - श्रोत्यांची मागणी..!!
अहमदनगर : येथील आकाशवाणी अहमदनगर केंद्राचे संध्याकाळचे प्रसारण पुन्हा सुरु होत आहे . त्या निमित्ताने काही वर्षांपूर्वी बंद करण्यात आलेला नगरी नगरी कार्यक्रम पुन्हा सुरु करण्यात याव अशी मागणी नगर, अकोला, पारनेर, नेसासा, पाथर्डी,वांबोरी , शिर्डी, राहुरी आदि. तालुकासहित अनेक ठिकणांहून नियमीत श्रोत्यांनी केली आहे.
या संदर्भात सविस्तर माहिती अशी की , नगरी नगरी हा कार्यक्रम आकाशवाणी अहमदनगर केंद्रावर सुरु होता. किरण डहाळे या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनहिताचे प्रश्न त्यांच्या तिरकस शैलीतून मांडायचे . याशिवाय स्थानिक बोली भाषेत अर्थात नगरी बोली भाषेत सादर केला जाणारा हा एकमेव कार्यक्रम होता . दर सोमवारी सकाळी नऊ वाजता श्रोते या कार्यक्रमाची वाट पहायचे. मात्र लोकप्रियतेच्या शिखरावर असलेला हा कार्यक्रम अचानक बंद करण्यात आला. यासंदर्भात किरण डहाळे यांच्याशी संपर्क साधला असता कार्यक्रम बंद करण्याचा निर्णय प्रशासकीय स्तरावर घेण्यात आला होता , असे त्यांनी सांगितले.
आकाशवाणी अहमदनगर केंद्राचे केंद्रप्रमुख राजेंद्र दासरी यांनी या संदर्भात तातडीने निर्णय घेऊन किरण डहाळे यांचा नगरी नगरी कार्यक्रम सुरु करण्यात यावा अशी श्रोत्यांची मागणी आहे.
Shirdi Express Live🎥#वृत्तसेवा करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

