shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आर्यवैश्य महासभेच्या जिल्हाध्यक्षपदी सूर्यकांत महाजन तर सचिवपदी अजय रुद्रवार !!


प्रकाश मुंडे/बीड जिल्हा प्रतिनिधी  :-

महाराष्ट्र आर्यवैश्य महासभेच्या बीड जिल्हाध्यक्षपदी क्रियाशील व्यक्तिमत्वाचे सूर्यकांत महाजन यांची तर सचिवपदी अजय रुद्रवार यांची तर कार्याध्यक्षपदी वैभव झरकर व कोषाध्यक्षपदी बालाजी बासटवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली.




      बीड जिल्ह्याच्या विद्यमान कार्यकारिणीची कालावधी संपल्यामुळे मागील तीनवर्षांच्या ताळेबंदाला मान्यता देण्यासाठी सचिव वैभव झरकर यांनी बैठकीची सूचना काढली होती व याच बैठकीत नवीन कार्यकारिणीच्या निवड व्हावी याकरिता महासभेकडून  समन्वयकांची नियुक्ती करण्यात आली होती. नियुक्त समितीतील अभय कोकड , विकास डुबे व अनिल चिद्रवार , संजीवजी डुबे , नागनाथ पारसेवार , अजित भावठणकर  यांनी त्यांना निवड  प्रक्रियेसाठी मिळालेल्या प्राप्त निर्देशानुसार  इच्छुकांचे अर्ज मागवले त्यानुसार निहित वेळेत प्राप्त झालेल्या अर्जांना अनुसरून माजलगाव येथे महासभेच्या सर्व जिल्हा सदस्यांची बैठक घेण्यात आली. त्याठिकाणी प्राप्त अर्जंवर विचार व खुली चर्चा होऊन अनेकांनी आपले अर्ज वापस घेतल्याने  प्रत्येक पदासाठी एकच अर्ज राहिला होता तसेच या बैठकीच्या अजेंड्यानुसार मावळते अध्यक्ष सुमित रुद्रवार , सचिव वैभव झरकर व कोषाध्यक्ष अभय भावठणकर यांनी तीन वर्षांचा ताळेबंदासह धारूर येथे झालेल्या कुटुंब मेळाव्याचा ताळेबंद सर्वांना सादर केला व त्यास सर्वसंमतीने मान्यता देण्यात आली.  


माजलगाव येथे सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर सोमवार दि 12 ऑगस्ट रोजी परळी येथे महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष नंदकुमार  गादेवार यांनी बीड जिल्ह्याच्या  जिल्हाध्यक्षपदी महासभेचे जेष्ठ सदस्य असलेले बीड येथील सूर्यकांत महाजन यांची तर सचिवपदी माजलगाव येथील प्रतिष्ठित सराफ व्यापारी अजय रुद्रवार यांची तर  कार्याध्यक्षपदी माजी सचिव असलेले परळी येथील वैभव झरकर यांची तर कोषाध्यक्षपदी अंबाजोगाई  येथील बालाजी बासटवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उर्वरित कार्यकारिणीच्या निवडीसाठी नवनियुक्त कार्यकारिणीला जिल्ह्याचा दौरा करून लवकरात लवकर निवडी करण्याच्या सूचना यावेळी 

 देण्यात आल्या.  यावेळी महासभेचे सर्व सदस्यांची उपस्थिती होती.

close