शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृतसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे
शनिवार १७ ऑगस्ट २०२४
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खडांबे खुर्द येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न..!!
राहुरी (खडांबे खु.) : राहुरी तालुक्यातील खडांबे खु. येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत 78 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात पार पडला. प्रभात फेरी , ध्वजारोहण, भाषणे, बक्षिसे, सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट असा सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. विद्यार्थ्यांची वेशभूषा , लेझीम नृत्य उपस्थित नागरिक आणि पालकांसाठी लक्षवेधी होती.
या कार्यक्रमाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांचे भाषणे होती. मराठी हिंदी व इंग्रजी अशा तीनही भाषेमध्ये विद्यार्थ्यांनी भाषणांचे सादरीकरण केले. असा भरगोस कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमास ग्रामस्थ व पालकांनी अतिशय भरघोस असा प्रतिसाद दिला. महिला वर्ग ही मोठ्या संख्येने उपस्थित होता.
खडांबे खुर्द गावच ज्येष्ठ नागरिक व्यक्तिमतत्व आणि भूषण वाटाव असे वायू दलातील सेवानिवृत्त अधिकारी स्क्वाड्रन लीडर कोंडीराम कल्हापुरे यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
त्यानंतर विद्यार्थ्यांचा बक्षीस वाटपाचा कार्यक्रम पार पडला. विविध प्रज्ञाशोध परीक्षेत यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच पालक आणि ग्रामस्थांच्या ठेवींच्या व्याजातून इयत्ता पहिली ते चौथीतील गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस वाटप करण्यात आले. स्क्वाड्रन लीडर कोंडीराम कल्हापुरे यांनी सालाबाद प्रमाणे शाळेतील आदर्श विद्यार्थी व आदर्श विद्यार्थ्यांकरिता प्रत्येकी रू.५००/- या प्रमाणे रोख बक्षीसे दिले.
शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष जगदीश हरिश्चंद्रे , माजी अध्यक्ष प्रभाकर हरिश्चंद्रे ,सदस्य लक्ष्मण हरिश्चंद्रे यांनी शाळेतील गरीब होतकरू मुलासाठी प्रत्येकी एक गणवेश दिला. सविता साळवे यांनी गरीब होतकरू मुलासाठी शेलेय साहित्याचे वाटप केले.
तसेच व्यासपीठ च्या ठिकाणी सभा मंडपासाठी अनेक मान्यवरांनी रोख स्वरूपात भरघोस अशी देणगी दिली. उपस्थित पालकांनी विद्यार्थ्यांसाठी खाऊ दिल्याने शाळा व्यवस्थापन समिती तसेच शिक्षकांनी त्यांचे आभार मानले.
कार्यक्रमासाठी पंचायत समितीचे माजी उपसभापती बाळासाहेब लटके, खडांबे खु. येथील लोकनियुक्त सरपंच आण्णा माळी, उपसरपंच,ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, ग्रामसेवक,विविध कार्यकारी सोसायटी संचालक, सदस्य,शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, अंगणवाडी सेविका आणि शिक्षिका,आरोग्य कर्मचारी, आदी. मान्यवर ग्रामस्थ आणि पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयातील शिक्षक कुलट व जगदीश हरिश्चंद्रे यांनी केले तर प्रास्ताविक मुख्याध्यापिका मनिषा विप्रदास यांनी केले.
Shirdi Express Live🎥#वृत्तसेवा करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

