shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

म्युझिक लव्हर्स ग्रुप आणि ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने १५ ऑगस्ट दिन उत्साहात साजरा

प्रतिनिधी : आसावरी वायकर

नगर : १७ /  म्युझिक लव्हर्स ग्रुप आणि ग्रामीण पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्य  यांच्या संयुक्त विद्यमाने दि .१५ ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी २ ते ५ या वेळेत १५ ऑगस्ट दिना निमित्ताने देशभक्ती पर गीतांचा कार्यक्रम बाजार समितीचे शेतकरी निवास यांच्या सहकार्याने मार्केट यार्ड येथे मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला.
 म्युझिक लव्हर्स ग्रुप मार्फत विविध गाजलेली सुप्रसिद्ध देशभक्तीपर गाणी सादर  करण्यात आली .

श्री.विनय गुंदेचा, पंढरीनाथ लांडगे, मनिष मुथ्था, संजय वायकर , किशोर बनसोडे, राजु क्षेत्रे, किरण वैकर, शिरिष बेगडे सर या सगळ्या हौशी कलाकारांनी मराठी व हिंदी गीते गायली . 

महंमद रफी, मुकेश, उदित नारायण, शंकर महादेवन, महेंद्र कपूर, हृदयनाथ मंगेशकर, रुपकुमार राठोड, हेमंत कुमार, अरिजीत सिंग अशा अनेक प्रसिद्ध  गायकांची गाणी सादर करण्यात आली . जहाँ डाल डाल पर, शूर आम्ही सरदार आम्हाला, बल सागर भारत होवो,  हे राष्ट्र देवतांचे, सुनो गौर से , तेरी मिट्टी मे मिल जावाँ , आवो बचो, छोडो कल कि बातें , भारत का रहेनेवाला हु ,  मेरे देश की धरती ये , ये देश वीर जवान का , ओ देश मेरे , संदेसे आते है , जिंदगी मौत ना बन जाये अशी विविध गाणी सादर केली .
जन गन मन राष्ट्रगीताने कार्यक्रमाची  सांगता झाली .

श्री .किरण वैकर यांनी सुत्रसंचालन केले तर श्री .विनय गुंदेचा यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले . यावेळी अनेक महिला व नागरिक मान्यवर रसिक उपस्थित होते .
close