shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

३० व ३१ ऑगस्ट रोजी साताऱ्यात पाली भाषा मूलभूत ज्ञान परिचय कार्यशाळा


सातारा / प्रतिनिधी:
विद्यार्थी,शिक्षक, प्राध्यापक, नागरिक , संशोधक , ज्येष्ठ नागरिक,अभ्यासक बंधू भगिनी यांना कळविण्यात येते की, आमच्या  कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे भाषा मंडळ, छत्रपती शिवाजी कॉलेज,सातारा मराठी विभाग व पाली रिसर्च इन्स्टिट्यूट मुंबई ,यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये  प्राचीन भाषेचे जतन व संवर्धन करण्याच्या उद्देशाने पाली भाषा मूलभूत ज्ञान परिचय दोन दिवसीय कार्यशाळा आयोजित केलेली आहे. ही कार्यशाळा शुक्रवार दिनांक ३० व शनिवार दिनांक ३१ ऑगस्ट २०२४ या दिवशी सकाळी १० ते ५ या वेळेत घेतली जाणार आहे. शुक्रवार दिनांक ३० ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी १० वाजता या कार्यशाळेचे उद्घाटन कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू मा.डॉ.ज्ञानदेव म्हस्के यांचे हस्ते होणार असून या समारंभाचे अध्यक्ष म्हणून  छत्रपती शिवाजी कॉलेजचे प्राचार्य डॉ.राजेंद्र मोरे हे उपस्थित राहणार आहेत. 
या समारंभास विद्यापीठाचे विविध पदाधिकारी उपस्थित राहतील. पाली भाषा कार्यशाळेचे मार्गदर्शक तज्ञ म्हणून मुंबई येथील पाली रिसर्च इ्स्टिट्यूट चे मा. अरविंद भंडारे व मा. विकास ढवळे हे मार्गदर्शन करणार आहेत. पाली भाषेचे महत्व ,पाली भाषा व्याकरण, पाली व अन्य भाषा संबंध,पाली भाषा साहित्याचा इतिहास, पाली कालखंडातील सामाजिक , राजकीय , सांस्कृतिक स्थिती या बद्दल या कार्यशाळेत माहिती दिली जाईल. विशेषतः  बुद्धांच्या नंतर झालेल्या तत्त्वज्ञान ग्रंथाची माहिती इथे होणार आहे. त्रिपिटक मधील विविध ग्रंथ या वेळी विक्रीसाठी उपलब्ध असतील. त्यामुळे सदर कार्यशाळेस आपण उपस्थित राहावे. या कार्यशाळेसाठी शुक्रवार दि.३० ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ९.३० वाजता छ.शिवाजी कॉलेज मध्ये नोंदणी करता येईल. या कार्यशाळेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी केवळ रुपये ३०० फक्त नोंदणी शुल्क असेल तर शिक्षक,प्राध्यापक, व इतर नागरिक यांचेसाठी ५०० रुपये नोंदणी शुल्क असेल. 

ज्यांना लगेच नोंदणी करायची असेल त्यांनी
*9890726440*
या मोबाईलवर आपले नोंदणी शुल्क पाठवून याच नंबरला व्हाटसॲप द्वारे 
शुल्क भरल्याची पावती पाठवावी.
केवळ मर्यादित १०० जणास प्रवेश देणे शक्य होईल,दोन्ही दिवशी सहभागी यांना सकाळी अल्पोपहार व चहा , दुपारी भोजन,व्यवस्था केली आहे तरी जिज्ञासू असलेल्या सर्वांनी यात सहभागी व्हावे 
अशी विनंती करण्यात आली आहे.तसेच निवास व्यवस्था करता येणार नाही, ज्यांनी त्यांनी आपपल्या परिने निवास व्यवस्था करावयाची आहे असेही प्रा.डॉ.सुभाष वाघमारे, मराठी विभाग प्रमुख, छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

प्रा.डॉ.सुभाष वाघमारे, 

*संकलन
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर -९५६११७४१११
close