shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

देशभक्तीपर समूह गायन स्पर्धेत सेंट झेवियर्स प्रथम...


शौकतभाई शेख / श्रीरामपूर
शहरातील इंडियन रेड क्रॉस सोसायटी आयोजित देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा नुकतीच संपन्न झाली. स्पर्धेत शहरासह ग्रामीण भागातील अनेक संघांनी आपला सहभाग नोंदवला. सदर स्पर्धेत शास्त्रीय संगीतावर आधारलेले सुमधुर देशभक्तीपर गीत गायन सादर करून सेंट झेवियर्स शाळेने प्रथम क्रमांक (विभागून) मिळविला. प्रशासकीय इमारत सभागृहात आयोजित बक्षिस वितरण कार्यक्रमात प्रांताधिकारी किरण सावंत पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे, रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्या मीनाताई जगधने, डॉ. सुहास बर्दपुरकर, मुंबई येथील सामाजिक कार्यकर्ते इकबाल मदनानी, नगरपालिका शिक्षण विस्तार अधिकारी संजीवन दिवे, उद्योजक संदीप शहा, सचिव सुनील साळवे, भरत कुंकलोळ व मान्यवरांच्या हस्ते विजयी संघांना स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले.


स्पर्धेत  स्नेहा दळवी, आलिशा कसबे, सारा दळवी, भूमिका कोळगे, आदिती भोसले, महिमा भालेराव व सई तोडमल या विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. विजयी संघाचे शाळेचे प्राचार्य फा.विक्रम शिनगारे व शाळेचे व्यवस्थापक फा. प्रकाश भालेराव यांनी विशेष अभिनंदन केले. या संघास संगीत शिक्षक प्रतीक फुलपगार व शालेय गायन मंडळ समन्वयक रवी त्रिभुवन यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

*वृत्त विशेष सहयोग
रवि त्रिभुवन (सर), श्रीरामपूर
*संकलन
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - ९५६११७४१११
close