हर्षवर्धन पाटील यांचा पळसदेव येथील संवाद यात्रा दरम्यान श्री पळसनाथ शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने सन्मान.
पळसदेव: दि. १३ राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष तथा माजी सहकार व संसदीय कामकाज मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शेतकऱ्यांची जीवनदायी असलेले उजनी धरणातील पाण्याचे जलपूजन केल्यानंतर पळसदेव या ठिकाणी संवाद यात्रेदरम्यान पळसदेव व पंचक्रोशीतील तमाम नागरिकांशी संवाद साधला. त्यानंतर श्री पळसनाथ शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष भूषण काळे, मल्हारी काळे, सदाशिव काळे, विजयकुमार काळे, अशोक जाधव, सुरेश बनकर, हिराजी काळे, संतोष पवार, आप्पासाहेब यमपुरे, अमोल मिसाळ आदी मान्यवर उपस्थित होते.