shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

विश्वासराव रणसिंग महाविद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा*

**विश्वासराव रणसिंग महाविद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा* 
इंदापूर: इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे विश्वासराव रणसिंग महाविद्यालय कळंब वालचंदनगर या ठिकाणी १५ ऑगस्ट या स्वातंत्र्यदिनी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले,संस्थेचे सचिव विरसिंह रणसिंग यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले,त्यानंतर ध्वजास मानवंदना देण्यात आली,संस्थेचे सचिव विरसिंह रणसिंग यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले व भारताची तंत्रज्ञान क्षेत्रात होत असलेली प्रगती त्यांनी मनोगतात अधोरेखित
 केली व सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विजय केसकर यांनी मान्यवरांचे स्वागत केले.
यानंतर महाविद्यालयातील सांस्कृतिक विभागातील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते व नृत्य सादर केले व उपस्थितांची मने जिंकली,या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय सेवा योजना विभागातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली,ध्वजारोहणाच्या कार्यक्रमानंतर महाविद्यालयात नव्याने स्थापन झालेल्या भित्तीचित्र फलकाचे मान्यवर व विद्यार्थी प्रतिनिधींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले,पोस्टर च्या माध्यमातून विद्यार्थ्यांकडून स्वातंत्र्य संग्रामावर प्रकाश टाकण्यात आला भित्तिफलक समन्वयक प्रा.बबन साळवे यांनी मान्यवरांना या उपक्रमाची थोडक्यात माहिती दिली
कार्यक्रमाचे व्यवस्थापन प्रा.सुहास भैरट यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा.आकाश झगडे आणि प्रा.विद्या गुळीग यांनी केले,आभार प्रा.अस्मिता चांदगुडे यांनी मानले.
 स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमासाठी संस्थेचे सचिव मा.विरसिंह रणसिंग,प्राचार्य डॉ.विजय केसकर,उपप्राचार्य प्रा.ज्ञानेश्वर गुळीग सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
close