shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

हनुमान विद्यालय सुरवड शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.**गुणवंत व स्पर्धा परीक्षा यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार.*

हनुमान विद्यालय सुरवड शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.*
*गुणवंत व स्पर्धा परीक्षा यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार.*
इंदापूर: दि 15 भारतीय स्वातंत्र्याचा 78 वा स्वातंत्र्य दिन हनुमान विद्यालय सुरवड शाळेत येथे विविध उपक्रम घेत उत्साहात साजरा करण्यात आला. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत 9 ते 15 ऑगस्ट दरम्यान विविध उपक्रम घेत साजरा करण्यात आला. *प्रभात फेरी , ध्वजारोहण , राष्ट्रगीत , ध्वजगीत , महाराष्ट्र गीत , संचलन, कवायत, प्रतिज्ञा , गुणवंत विद्यार्थी सत्कार , विद्यार्थी भाषणे , सांस्कृतिक कार्यक्रम, बक्षिसे वितरण , खाऊ वाटप करण्यात आला.*
         कार्यक्रमाची प्रस्तावना मुख्याध्यापक  कोकाटे चंद्रकांत यांनी केले.
 इ 10 वी प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांना ग्रामपंचायत सुरवड भैरवनाथ पाणीपुरवठा संस्था सुरवड विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी सुरवड या प्रमुख संस्थांनी बक्षीस देऊन सत्कार केले. त्याचप्रमाणे दादासाहेब  घोगरे, सुरेश  मेहर, तात्यासाहेब  कोरटकर, आप्पासाहेब पारेकर, तानाजी कोरडकर यांच्याकडून दहावीतील प्रथम तीन क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आले.
 तसेच  स्वप्निल घोगरे, अनिल दडस या पालकांनी शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश दिले.  झाय टॉनिक कंपनी मार्फत काही गणवेश देण्यात आले.
याप्रसंगी विद्यार्थ्यांच्या भाषण कु साक्षी कांबळे, कु श्रेया जगताप तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी भाषणे काही विद्यार्थ्यांनी भाषणे केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी एज्युकेशन सोसायटीचे  खजिनदार  राजेंद्र  सूर्यवंशी यांचे शुभ हस्ते बक्षीस व गणवेश  वाटप करण्यात आले.

         यावेळी  सुरेश  मेहेर , शिवाजी कोरटकर , साहेबराव  घोगरे,. चांगदेव  घोगरे,  दादासाहेब  घोगरे., मोहन कोरटकर, प्रभाकर  जाधव, दत्तात्रेय  जाधव ,  पांडुरंग  जगताप., विष्णू  तोडकर, तात्यासाहेब  कोरटकर, मनोहर कांबळे. केशव  कांबळे,. चंद्रकांत शेरकर, तुकाराम शिंदे, गणपत सुतार, आप्पासो पारेकर, बाळासाहेब  घोगरे, दीपक कांबळे, विष्णू पांढरे, हनुमंत खामगळ, शहाजी खोपकर, तात्यासाहेब खोपकर, गुलाबराव भाळे, तानाजी कोरटकर. सतीश माने, अनिल सदाशिव दडस, स्वप्निल घोगरे. कृष्णदेव बनसोडे, सतीश  घोगरे.रावसाहेब घोगरे. शौकत  मुलानी.  विलास  सुतार,अजित  बनसुडे, ब्रह्मदेव कोरटकर,
  युसुफ मोमीन,दत्तात्रय तोरस्कर, माजी सैनिक मेजर भाळे, मेजर जाधव, लोहोकरे आर बी ,राखुंडे तानाजी नाईक ,बी एम शिंदे, एस एस पवळ ,ए बी सौ खरात एस ए कोरडकर बी एम सूर्यवंशी ये डी महिला , विद्यार्थी , पालक मोठ्या 350 पेक्षा जास्त संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन प्रकाश धुमाळ आभार खामगळ विजय यांनी मानले 
close