shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

एन.ई.एस. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय निमसाखर येथे ७८वा स्वतंत्र दिन मोठ्या थाटामाटात साजरा

एन.ई.एस. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय निमसाखर  येथे ७८वा स्वतंत्र दिन मोठ्या थाटामाटात साजरा .
इंदापूर: निमसाखर एज्युकेशन सोसायटीचे एन.ई.एस. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय निमसाखर तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथे ७८वा स्वतंत्र दिन मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. 
त्यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे  अध्यक्ष राजेंद्र कुमार सूर्यकांत रणवरे हे उपस्थित होते. तर प्रमुख अतिथी म्हणून निमसाखर गावचे माजी सरपंच शिवाजी पांडुरंग रणवरे  होते.  शिवाजी रणवरे यांच्या हस्ते  ध्वजारोहण करण्यात आले. त्यावेळी पंचक्रोशीतील माजी सैनिक उपस्थित होते. सर्व विद्यार्थी पालक ग्रामस्थ शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला. त्यावेळी यशवंत विविध कार्यकारी विकास सोसायटीचे विद्यमान चेअरमन नंदकुमार सूर्यकांत रणवरे उपस्थित होते. तसेच संस्था पदाधिकारी, संस्था सदस्य कल्याणराव देशमुख, ग्रामपंचायत सदस्य गोरख शेळके, प्रताप कदम, मानसिंग रणवरे, महादेव रणवरे, दिलीप माने, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चंद्रकांत काळे, तुळशीदास महानवर, विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक दिलीप पवार सर, निमसाखर येथील सर्व माजी सैनिक, व परिसरातील सर्व नागरिक उपस्थित होते.विद्यालयातील काही माजी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी देखील उपस्थित होते. त्यावेळी विद्यालयातील काही विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त भाषणे केली. जूनियर न्यूटन टॅलेंट सर्च परीक्षेमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना मेडल्स व प्रमाणपत्र ही प्रमुख मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली. विद्यार्थ्यांनी सर्व कवायत प्रकार अत्यंत व्यवस्थितपणे सादर केले. त्यावेळी विद्यालयाचा माजी विद्यार्थी रामचंद्र केंगार व त्यांची पत्नी स्वाती केंगार उपस्थित होते. विद्यालयाच्या व संस्थेच्या वतीने त्यांचा शाल श्रीफळ देऊन फेटा बांधून सन्मान करण्यात आला. आपले विद्यालय खरोखरच उत्तम प्रकारचे विद्यार्थी घडवत असल्याची माहिती रामचंद्र केंगार यांनी त्यांच्या भाषणात दिली. त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप म्हणून बिस्कीटचे 400 पुडे आणले होते. माजी सैनिक महेश जाधव यांची नुकतीच कॅनॉल इन्स्पेक्टर पदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचाही विद्यालयाच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. त्यावेळी विद्यालयाचे प्राचार्य चंद्रकांत गोपाळराव रणवरे म्हणाले की, स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आपल्या देशाच्या स्वातंत्र्य मिळवण्यामध्ये ज्या ज्या क्रांतिकारांचा समावेश आहे अशा सर्वांना विनम्र अभिवादन. अनेक महान क्रांतिकारक या मातीतून जन्मले संपूर्ण आयुष्य देशाच्या संरक्षणासाठी खर्च केले. अशा या महान क्रांतिकारकांचा स्मरण करण्याचा दिवस आहे असं म्हटलं तरी वावगे ठरणार नाही. संस्थेचे अध्यक्ष  राजेंद्रकुमार सूर्यकांत रणवरे आपल्या अध्यक्षीय भाषणात  त्यांनी सर्वांना आजच्या या स्वातंत्र्यदिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. आपल्या देशाला मिळालेले स्वातंत्र्य हे सहजासहजी मिळालेले नसून अनेक शूरवीरांनी, महापुरुषांनी, आपले संपूर्ण आयुष्य प्राण पणाला लावले आहे, आपण सर्वांनी या शूरवीर क्रांतिकारकांचा आदर्श नेहमी डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. देशसेवा व देशभक्ती, राष्ट्रभक्ती, राष्ट्रप्रेम या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. प्रत्येकाच्या  मनामध्ये आपल्या देशाबद्दल व देशाच्या संस्कृतीबद्दल अभिमान असला पाहिजे. बदलत्या काळामध्ये तरुण पिढी पुढे खूप आव्हाने आहेत.  त्यांनी ही आव्हाने खूप सक्षमपणे पेलली पाहिजेत. विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर आरोग्य ही व्यवस्थित ठेवले पाहिजे. त्यासाठी दररोज व्यायामही केला पाहिजे. असे मत त्यांनी व्यक्त केले. उत्तम प्रकारे कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभागाने केले. उत्तरोत्तर विद्यालयाची प्रगती होत असल्याचा आनंदही त्यांनी त्यावेळी व्यक्त केला हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी विद्यालयाचे प्राचार्य चंद्रकांत गोपाळराव रणवरे सर पर्यवेक्षक मधुकर शंकरराव खरात सर ज्येष्ठ शिक्षक चंद्रकांत बलभीम बोंद्रे सर यांनी विशेष मार्गदर्शन केले व विद्यालयातील सर्व शिक्षक बंधू भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी खूप उत्तम प्रकारचे सहकार्य केले. प्रमोद चव्हाण सर व अजिनाथ मलगुंडे सर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. आभार प्रदर्शन वैभव हणमते सर यांनी केले. अशी माहिती विद्यालयाचे प्राचार्य चंद्रकांत रणवरे यांनी दिली.
close