प्रकाश मुंडे/बीड जिल्हा प्रतिनिधी :-
विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक साहित्य वाटप करणारे जिल्ह्यातील एकमेव शाळा म्हणून बीड जिल्ह्यात सानेगुरुजी निवासी विद्यालय केज ने शिक्षण क्षेत्रात एक आदर्श निर्माण केला आहे.
आज नवीन शैक्षणिक वर्षाच्या पूर्वसंध्येला विद्यार्थ्यांना वह्या पुस्तके शालेय दप्तर चे वाटप करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून केज तालुका गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण बेडसकर हे होते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष साने गुरुजी निवासी विद्यालयाच्या प्राचार्य / मुख्याध्यापिका डॉ कविता गित्ते हरिभाऊ पाटोळे , उत्तम मोती, बाबासाहेब चाटे, यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
यावेळी शाळेतील प्रवेशित सर्व निवासी
विद्यार्थ्यांना वह्या , पुस्तकं, दप्तर ,इत्यादी शैक्षणिक साहित्याचे वाटप केज तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण बेडसकर यांच्या हस्ते करण्यात आले. या शैक्षणिक साहित्यांचे वाटप कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना बेडसकर म्हणाले की विद्यार्थ्यांना दिलेले शैक्षणिक साहित्य अतिशय दर्जेदार व चांगल्या प्रतीचे आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात साडेसातशे मुलांचं निवासी वसतिगृह चालवणं व त्यांना दर्जेदार सुविधा देणे हे सोपे काम नाही. खरंच सदर शाळा व वसतिगृह हे अतिशय वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी चालतं याचा केज तालुक्याला अभिमान आहे. फक्त वस्तीग्रह व शाळा चालवायची म्हणून सदर शाळा चालत नसून एक मॉडेल स्कूल सध्या बीड जिल्ह्यात साने गुरुजी आहे असाही मत त्यांनी व्यक्त केलं. त्याबद्दल संस्था आणि शाळा प्रशासनाचे कौतुकही केले तसेच मुलांना या नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती सुवर्णा सिरसाट यांनी केले तर आभार शाळेचे ज्येष्ठ शिक्षक हरिभाऊ पाटोळे यांनी आभार मानले आणि विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. संपूर्ण कार्यक्रम अतिशय शिस्तबद्ध व आनंददायी वातावरणात पार पडला.