shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जय भवानीगड विकास प्रतिष्ठान लाखेवाडीमध्ये भक्तिमय वातावरणात जमला बाल वैष्णवांचा मेळा

जय भवानीगड विकास प्रतिष्ठान लाखेवाडीमध्ये भक्तिमय वातावरणात जमला बाल वैष्णवांचा मेळा
इंदापूर : जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संचलित,विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज व प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल लाखेवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने वार-गुरुवार, (दि. 3 जुलै)  रोजी पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
आषाढी वारी ही महाराष्ट्रातील धार्मिक व सांस्कृतिक वारसा आहे. पंढरीची वारी म्हणजे महाराष्ट्रातील मोठा सणच आहे,
आषाढ महिन्याची चाहूल लागतात ओढ लागते ती पंढरीच्या वारीची

 आषाढी वारीचे महत्व विद्यार्थ्यांना समजावे म्हणून प्रशालेमध्ये पालखी सोहळ्याचे भव्य असे आयोजन नियोजन करण्यात आले होते. 
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष  श्रीमंत ढोले,सचिव  हर्षवर्धन यांनी पालखीचे पूजन केले व भवानीमाता मंदिराकडे पालखीचे प्रस्थान करण्यात आले.
पालखी सोहळ्यामध्ये विद्यार्थी हरीमय वारकरी  झाले होते, पायीवाट चालत, मुखामध्ये हरिनामाचा गजर करीत, अभंग, भजनात तल्लीन होऊन हरिनामाचा जयघोष करीत होते.
 प्रशालेतील विद्यार्थ्यांनी वारकरी संप्रदायाचा वारसा पुढे अविरतपणे चालू ठेवण्यासाठी छोट्या बालवारकऱ्यांनी विठ्ठल-रुक्मिणी, निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई,संत तुकाराम, गोरोबा कुंभार, संत जनाबाई इत्यादी वारकरी पोशाख परिधान करून वातावरण भक्तिमय केले होते. 
बाल वारकऱ्यांनी टाळ घोषाचा गजर करीत,ढोल ताशाचा गजरात, लेझीमच्या तालावर आणि 
नामगजरात पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते. 
हातात टाळ आणि पताका, कपाळाला गंधाचा टिळा,डोक्यावर तुळशी, विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती घेऊन विद्यार्थी पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते.
पालखी सोहळ्यानिमित्त 
बालवारकऱ्यांचा मैदानावरती भव्य असा रिंगण सोहळा घेण्यात आला. त्यामध्ये छोट्या वारकऱ्यांनी पताका, तुळशी, टाळ घेऊन हरिनामाच्या जयघोषात व मृदंगाच्या तालावर रिंगण सोहळा पार पडला. रिंगण सोहळा झाल्यानंतर वारकरी फुगड्यांचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये संस्थेच्या उपाध्यक्ष 
सौ. चित्रलेखा ढोले  यांनी फुगडीसाठी फेर धरला तसेच संस्थेचे सचिव श्री. हर्षवर्धन खाडे यांनीही फुगडीचा मनापासून आनंद घेतला व बालकऱ्यांचा आनंद द्विगुणित केला तसेच शिक्षकांनीही फुगडी चा मनोमन आनंद घेतला.
प्रशालेतील विद्यार्थिनींनी विठ्ठल भक्ती गीतावर टाळ, मृदुंग, वाद्यासह नृत्यांचे अविष्कारमय सादरीकरण केले.
 संपूर्ण जय भवानीगड परिसर हरीमय वातावरणात रंगून गेला होता विद्यार्थ्यांचाही उत्साह भरभरून  दिसत होता.
पालखी सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष  श्रीमंत ढोले, उपाध्यक्ष सौ.चित्रलेखा ढोले, सचिव  हर्षवर्धन खाडे, मुख्य सल्लागार  प्रदीप गुरव, संस्थेचे विश्वस्त चि.ऋषिकेश ढोले, विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य  गणेश पवार, प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य  राजेंद्र सरगर, विद्यानिकेतन कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य  सम्राट खेडकर सर्व विभागाचे सुपरवायझर ,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
close