shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अनंतराव पवार प्राथमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आषाढी वारी दिंडीसह संत सोपान काकांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होत केले स्वागत.

अनंतराव पवार प्राथमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आषाढी वारी दिंडीसह  संत सोपान काकांच्या पालखी सोहळ्यात  सहभागी होत केले स्वागत.
इंदापूर : संत सोपान काकांच्या पालखी सोहळ्यात निरनिमगावच्या  अनंतराव पवार प्राथमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आषाढी वारी दिंडीसह  सोहळ्यात सहभागी होऊन स्वागत केले.
संत सोपान काकांची व संत संतराज महाराजांच्या पालखी सोहळ्या बरोबर अनंतराव पवार प्राथमिक विद्यालय निर निमगाव (ता. इंदापूर) विद्यार्थी व विद्यार्थिनी वारकरी वेशभूषात निरनिमगाव चौकात दिंडी सोहळ्यात सहभागी होत प्राथमिक विद्यालयाचा पालखी सोहळा  टाळ, मृदंग, वीणा घेऊन बाल चमूने आनंद घेतला.
यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दत्तामामा घोगरे व सर्व समस्त ग्रामस्थ निर निमगाव, मुख्याध्यापक पिसे सर यांनी बालचमूचे कौतुक केले.
 या दिंडी सोहळ्याचे मार्गदर्शन करीत जाधव सर,भरणे सर,कुंभार सर, साठे सर,श्रीम काळे मॅडम,जगताप मॅडम, जोशी मॅडम, देवडे मॅडम यांनी मोलाचे योगदान दिले.
close