श्री संतश्रेष्ठ सोपान काका महाराज यांच्या पालखीचे भवानीनगर येथे उत्साहात स्वागत.
इंदापूर - भवानीनगर : श्री संतश्रेष्ठ सोपान काका महाराज यांच्या पालखीचे भवानीनगर येथे आगमन झाले. यावेळी पालखी सोहळा प्रमुख श्री त्रिभुवन महाराज गोसावी यांचा सत्कार अमोल भोईटे मित्रपरिवार व व्यापार पेठ तरुण मंडळ यांच्या वतीने करण्यात आला.
यावेळी पालखी सोहळा प्रमुख त्रिगुण महाराज गोसावी म्हणाले की, यावर्षी संत सोपान काका पालखी सोहळ्याला उत्साह आनंद आहे असून यावर्षी 125 दिंड्या आहेत साधारणपणे एक लाख वीस हजार ते एक लाख 35 हजार पर्यंत वारकरी आहेत.
दरम्यान अतिशय उत्साही वातावरणात भवानीनगर येथे छत्रपती कारखान्याच्या वतीने स्वागत करण्यात आले व श्री महागणपती व्यापार पेठ तरुण मंडळाच्या वतीने वारकऱ्यांना महाप्रसादाचा लाभ देण्यात आला.