*राजर्षी शाहू बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या अध्यक्ष उज्वला शिंदे यांचा दृढ विश्वास...*
*महादू पवार
पत्रकार मुंबई
9867906135
धाराशिव : छत्रपती राजश्री शाहू महाराज यांचे विकासाचे विचार संपूर्ण महाराष्ट्राच्या घरामध्ये पोचवण्यासाठी धाराशिव मधून एका राजर्षी शाहू बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा उद्घाटन सोहळा निमित्ताने क्रांतिकारी सामाजिक संघटना उभारले असून हा विचार पोहोचवण्याचा संकल्प आम्ही करत आहोत, अशी घोषणा या संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष उज्वला शिंदे पाटील यांनी आज जाहीर केली. यावेळी या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून सो संयोजनी ओमप्रकाश राजे निंबाळकर त्यांची उपस्थिती प्रामुख्याने होती.
छ . राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून शहरातील राजर्षी शाहू बहुद्देशीय सेवाभावी संस्थेचा उद्घाटन सोहळा एमआयडीसी परिसरात 21 वृक्षांचे वृक्षारोपण करून उत्साहात साजरा करण्यात आला.
या उद्घाटन सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून सौ. संयोजिनी ओमप्रकाश राजे निंबाळकर या उपस्थित होत्या. तसेच शहरातील नामवंत मान्यवरही उपस्थित होते.
यामध्ये डॉ. अमोल राजे निंबाळकर, युवराज नळे, ॲड. धर्मराज सोनवणे, ॲड. पठाण , पत्रकार अजय अणदुरकर, गणेश देवसिंगकर, विपिन वीर, अखिल भारतीय जि वा सेनेचे जिल्हाध्यक्ष नामदेव वाघमारे, सुमित शेरखाने, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंच अध्यक्ष प्रा. रवी सुरवसे, आदी मान्यवर उपस्थित होते.मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. वृक्षारोपणात आंबा, फणस,जांभूळ,चिंच, आपटा आदि 21 झाडांचा समावेश होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती राजे निंबाळकर यांनी छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या विचारांवर महाराष्ट्रातल्या जनतेने चिंतन करण्याची गरज आहे असे सांगितले,तर प्रास्ताविक उज्ज्वला शिंदे यांनी केले.या कार्यक्रमासाठी प्रसाद राजे निंबाळकर,अतुल कासेगावकर,माधवी पारीख, वनिता शिंदे ,रमेश पाटील,विशाल डोंगरे श्रीकांत शिंदे यांनी परिश्रम घेतले.