shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वनपालांकडून ८ हजाराची लाच स्वीकारताना रंगेहात कारवाई; पारोळ्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई.

जळगाव, प्रतिनिधी – पारोळा तालुक्यातील वनपरिक्षेत्र कार्यालयात कार्यरत असलेल्या दोन वनपालांनी सागाच्या झाडांची तोड परवानगी देण्यासाठी शेतमालकाच्या प्रतिनिधीकडून ८ हजार रुपयांची लाच स्वीकारली. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव युनिटने रंगेहात सापळा रचत ही लाच स्वीकारताना दोघांपैकी एकास रंगेहाथ पकडले आहे. दुसऱ्या वनपालाला नोटीस देऊन सोडण्यात आले आहे.

🟠 सविस्तर माहिती

तक्रारदार हे पारोळा तालुक्यात सागाच्या झाडांची खरेदी-विक्री करणारे व्यापारी असून, त्यांनी इंधवे येथील एका शेतकऱ्याच्या शेतातील सागाची झाडे खरेदी केली होती. त्यानंतर या झाडांची तोड करण्यासाठी वनविभागाची अधिकृत परवानगी आवश्यक होती. त्या अनुषंगाने शेतकऱ्याने तक्रारदारास अधिकारपत्र दिले होते.

त्यानुसार तक्रारदार यांनी पारोळा वनपरिक्षेत्र कार्यालयात परवानगीसाठी अर्ज केला असता, तेथे कार्यरत असलेल्या वनपाल दिलीप भाईदास पाटील (वय ५२, रा. देवपूर, धुळे) यांनी परवानगी देण्यासाठी ८,००० रुपयांची लाचेची मागणी केली. सदरची तक्रार दिनांक १९ जून २०२५ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव यांच्याकडे प्राप्त झाली होती.

🔍 सापळ्याची पडताळणी व कारवाई

त्यानंतर लाचलुचपत विभागाने १९ जून रोजी सापळ्याची पडताळणी केली. आरोपी दिलीप पाटील यांनी लाच घेण्याची तयारी दर्शवली. अखेर आज दिनांक ०२ जुलै २०२५ रोजी, विभागाने रंगेहात सापळा कारवाई राबवली.

या कारवाईत तक्रारदारांकडून मागितलेले ८,००० रुपये दुसऱ्या आरोपीकडे – वनपाल वैशाली ज्ञानेश्वर गायकवाड (वय ३८, रा. पारोळा) यांनी पंचासमक्ष स्वीकारले. त्यावेळी तिला रंगेहात पकडण्यात आले.

📱 साक्षी व जप्ती

▪️ आरोपी क्रमांक २ कडून मोबाईल फोन जप्त करण्यात आले.

▪️ हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.

▪️ आरोपी क्रमांक १ व २ यांना ताब्यात घेण्यात आले असून, आरोपी २ ला नोटीस देऊन सोडण्यात आले आहे.

⚖️ गुन्हा दाखल प्रक्रिया सुरु

या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ अंतर्गत पारोळा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

👮‍♂️ सापळा व तपास अधिकारी

▪️ पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर, ला.प्र.वि. जळगाव – 9702433131

👥 सापळा पथकाचे सदस्य

1. सफौ सुरेश पाटील

2. मपोहेकॉ शैला धनगर

3. पोहेकॉ किशोर महाजन

4. पोकॉ राकेश दुसाने

5. पोकॉ अमोल सूर्यवंशी

🎯 मार्गदर्शक अधिकारी

▪️ मा. भारत तांगडे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि., नाशिक परिक्षेत्र – 8888832146

▪️ मा. माधव रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि., नाशिक परिक्षेत्र

🏛️ सक्षम अधिकारी -

मुख्य वनसंरक्षक, धुळे

🟢 विशेष:

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दाखवलेली तत्परता आणि काटेकोर कारवाईमुळे शासकीय कार्यालयातील भ्रष्टाचाराला चाप बसण्यास मदत होणार आहे.


— प्रतिनिधी


close