प्रतिनिधी – शिर्डी एक्सप्रेस वृत्तसेवा, अहिल्यानगर
नुकतेच अहिल्यानगर येथील संजोग एसी हाॅलमध्ये शिर्डी एक्स्प्रेस वृत्तसेवा १६वे वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्र रत्न पुरस्कार २०२५ सोहळा ऐतिहासिक व प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाले.
समाजमनावर आपली निःपक्ष, निर्भीड आणि ज्वलंत पत्रकारिता कोरून ठेवणाऱ्या शिर्डी एक्सप्रेस वृत्तसेवेचा १६ वा राज्यस्तरीय वर्धापन दिन आणि “महाराष्ट्र रत्न पुरस्कार २०२५” सोहळा एक संस्मरणीय पर्वणी ठरली.
या भव्य सोहळ्याचे सुयोग्य नेतृत्व संपादक मा. रमेश जेठे (सर) यांनी सौजन्यशील आणि प्रभावी पद्धतीने पार पाडले. राज्यभरातील मान्यवर, कर्तृत्ववान आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांनी या सोहळ्यास हजेरी लावली.
🎖 पद्मश्री पोपटराव पवार (आदर्श सरपंच, हिवरे बाजार) यांच्या प्रमुख उपस्थितीमुळे कार्यक्रमाला एक वेगळीच उंची लाभली. त्यांनी ग्रामविकास आणि लोकसहभाग यावर प्रभावी मार्गदर्शन करत उपस्थितांना विचारप्रवृत्त केले.
📰 सोहळ्यात जेष्ठ पत्रकार मनोजकुमार शंकरराव आगे, साहित्यिक टी.एस. चव्हाण, कृषितज्ज्ञ डॉ. बबन जोगदंड, नगरसेवक नितीन वाघमारे (लातूर) आणि सामाजिक कार्यकर्ते रवी शिंदे यांना देखील गौरवण्यात आले.
✨ विशेष उल्लेखनीय क्षण! ✨
“शिर्डी एक्सप्रेस” वृत्तसेवेच्या १६व्या वर्धापन दिन व “महाराष्ट्र रत्न पुरस्कार २०२५” या भव्य सोहळ्याचे उद्घाटक म्हणून सन्माननीय आमदार अभिमन्यूजी पवार साहेब यांची उपस्थिती अपेक्षित होती. मात्र, पावसाळी अधिवेशनामुळे त्यांना प्रत्यक्ष येणे शक्य झाले नाही, ही खंत सर्वत्र जाणवली.
तथापि, त्यांनी आपल्या प्रतिनिधीमार्फत एक हृद्य शुभेच्छा पत्र पाठवून संस्थेच्या कार्याचे मनःपूर्वक कौतुक करत, पुढील वाटचालीसाठी सदिच्छा व्यक्त केल्या. या पत्रातून त्यांच्या मनातील आपुलकी आणि सामाजिक बांधिलकी स्पष्टपणे दिसून आली.
हे शुभेच्छा पत्र मंचावरील वातावरणात एक प्रेरणादायी सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारे ठरले. श्रोते आणि उपस्थित मान्यवरांनी त्याचा मनापासून आनंद घेतला.
या सद्भावपूर्ण उल्लेखामुळे संपूर्ण सोहळ्याला एक सुसंस्कृत, सन्माननीय आणि गौरवशाली छटा लाभली!
🌟 एकूण २९ मान्यवर व्यक्तींना “महाराष्ट्र रत्न पुरस्कार २०२५” सन्मानाने गौरवण्यात आले. हे सर्व पुरस्कारार्थी आपल्या कार्यातून समाजाला दिशा देणारे दीपस्तंभ ठरले आहेत.
🎭 कार्यक्रमाला साहित्य, शिक्षण, कृषी, पत्रकारिता, विज्ञान, कला, सांस्कृतिक,प्रशासन व समाजसेवा क्षेत्रातील मान्यवरांची मोठी उपस्थिती लाभली. संपूर्ण कार्यक्रम सिनेअवार्ड थाटात आयोजित करण्यात आला होता.
💐 या भव्य आयोजनासाठी शौकतभाई शेख, शिवाजी ननवरे, विशाल जेठे, हरीश बंडीवडार, सुरेश जेठे,बबलू विटेकर,मयूर मिरे, राजेश धनवटे,नीरज जेठे आणि संपूर्ण शिर्डी एक्सप्रेस वृत्तसेवा परिवार यांचे विशेष योगदान लाभले. हा कार्यक्रम सिनेमा अवार्ड प्रमाणे ऐतिहासिक करण्यासाठी उध्दव काळापहाड,प्रियांका मॅडम, विशाल जेठे यांच्यामुळे झाल्याने त्यांचा सगळीकडे कौतुक होतांना दिसत होते. हे विशेष.
🏅 “महाराष्ट्र रत्न पुरस्कार २०२५” सन्मानित मान्यवर..
1. मा. भरत विटकर, पुणे
2. मा. राजेशजी ननवरे, अहिल्यानगर
3. मा. सदाशिव उत्तम जाधव,पुणे
4. मा. कर्नल ऋषिकेश भानुदासराव धोत्रे, लातूर
5. मा. कृष्णा पवार, श्रीरामपूर
6 मा.रवि शिंदे ,बाॅस), सोलापूर
7. मा. डॉ. मोहसीन युसूफ शेख,कर्जत,
8. मा. ॲड. साहेबराव शंकरराव बेळे, नांदेड
9. मा. चंद्रकांत शांताराम शहासने, पुणे
10. कीर्ती श्रीकांत भंडगे,पुणे
11. मा. युवराज फकिरा खोकरे, एरंडोल, जळगाव
12. कीर्ती पवार, पुणे
13. मा. बालाजी गोविंदराव जाधव, नांदेड
14. मा. आप्पासाहेब भिमराज दूस, राहुरी
15. ॲड. ललित सोहनलाल गुंदेचा, पुणे
16. मा. राजकुमार लक्ष्मण आघाव, अहिल्यानगर
17. सिने अभिनेत्री प्रिती, सांगवान, अहिल्यानगर
18. धर्मात्मा श्री. मिश्रीमल पुनमचंद मुथ्था, पुणे
19. सिने अभिनेत्री राणी कासलीवाल, अहिल्यानगर
20. मा. ऋषिकेश नारायण हराळ,नगर
21. मा. संदीप अशोक कुसळकर,सोनई
22. मा. रविंद्र (भोरू भाऊ) नामदेव म्हस्के,कोरेगाव, पाथर्डी
23 मा. आदिनाथ धनवटे, श्रीरामपूर
24. मा. दीपेश पिटेकर, शेवगाव
25 मा. किरण सखाराम दांगडे, अहिल्यानगर
26. प्रा. डॉ. सुहास पाखरे,नगर
27. प्रसाद दगाजी मोरे, मुंबई
28. बाबासाहेब कोंडीराम पवार, श्रीरामपूर
29. श्रीमंत तुळशीराम लष्करे, कोल्हापूर
🎉 शिर्डी एक्सप्रेस वृत्तसेवा समाजहितासाठी नव्या जोमाने कार्यरत राहील, हीच अपेक्षा.
> “पत्रकारितेचा आत्मा – निर्भयता आणि समाजदायित्व”