चेतना कॉलेज ऑफ फार्मसी तसेच चेतना इंटरनॅशनल स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज मध्ये नॅशनल डॉक्टर्स डे साजरा
इंदापूर : मंगळवार (दि. १जुलै)चेतना फाउंडेशन संचालित, चेतना कॉलेज ऑफ फार्मसी तसेच चेतना इंटरनॅशनल स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज, सरडेवाडी( ता. इंदापूर जि. पुणे) येथे नॅशनल डॉक्टर्स डे उत्साहितपणे पार पडला.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून इंदापूर तालुक्यातील प्रसिद्ध डॉ. संजय शहा व डॉ अनिल शिर्के हे लाभले तसेच चेतना कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ. गणेश म्हस्के सर व चेतना इंटरनॅशनल स्कूल व जुनियर कॉलेज चा प्राचार्य सौ. निकिता मॅडम उपस्थित होत्या.
आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. संजय शहा व डॉ.अनिल शिर्के यांनी उत्तम प्रकारे मार्गदर्शन केले.
समाजामध्ये डॉक्टरांचे महत्त्व ,जबाबदाऱ्या, भूमिका आणि भविष्यातील सामाजिक प्रश्न यावरती मार्गदर्शन केले.
फार्मासिस्ट आणि डॉक्टर यांचे समाजामधील महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले.
नॅशनल डॉक्टर्स डे निमित्त चेतना कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये निबंध स्पर्धा आयोजित केल्या होत्या.या स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले आणि डिप्लोमा प्रथम वर्ष फार्मसी चे टॉपर्स यांचे अभिनंदन करण्यात आले.
हा कार्यक्रम पार पडण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष उदय देशपांडे , सचिव विलास भोसले तसेच खजिनदार सोमनाथ माने सर यांचे मार्गदर्शन लागले.
प्रा.कांबळे मॅडम यांनी योग्य नियोजन केले तसेच कॉलेजमधील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थ्यांनी आपली उपस्थिती नोंदवली आणि कार्यक्रम उत्साहात पार पडला.