shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

एरंडोलच्या तेजल महाजनचा ए.टी.डी.च्या परीक्षेत 100% गुण मिळवत गौरव; जळगाव भाजप पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सत्कार.

एरंडोलच्या तेजल महाजनचा ए.टी.डी.च्या परीक्षेत 100% गुण मिळवत गौरव; जळगाव भाजप पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सत्कार

एरंडोल प्रतिनिधी
– देशमुख मढी (एरंडोल) येथील रहिवासी आणि भारतीय जनता पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते रवींद्र यादव महाजन यांची कन्या तेजल रवींद्र महाजन हिने ए.टी.डी. (Art Teacher Diploma) या कोर्सच्या प्रथम वर्षात 100% गुण मिळवत उल्लेखनीय शैक्षणिक यश मिळवले. तिच्या या अपूर्व कामगिरीबद्दल नुकताच सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला.

या सत्कार समारंभात भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा (पश्चिम) अध्यक्ष डॉ. राधेश्यामजी चौधरी, एरंडोल-रिंगणगाव मंडळाचे अध्यक्ष योगेश युवराज महाजन, शहर अध्यक्ष नितीन महाजन, निलेश परदेशी, अमरजितसिंग पाटील, माजी नगरसेवक जगदीश ठाकूर, नरेश ठाकरे, छोटू शिरसागर, दिगंबर बोरसे, नाना देसले, गुड्डू ठाकूर, आनंद सूर्यवंशी, मयूर ठाकूर, तेजलचा परिवार आणि इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमात तेजलने तिच्या कौशल्याचे आणखी एक दर्शन घडवले. तिने भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्यामजी चौधरी यांचा सुंदर स्केच स्वतःच्या हाताने तयार करून त्यांना सप्रेम भेट दिला. तिच्या या प्रतिभेचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले.

तेजल महाजनचे हे यश केवळ तिच्या कुटुंबीयांसाठीच नव्हे, तर संपूर्ण परिसरासाठी अभिमानास्पद आहे. तिच्या पुढील वाटचालीसाठी सर्वांनी शुभेच्छा दिल्या.


close