*भिमाई आश्रमशाळेत लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंतीदिनी विद्यार्थी बनले शिक्षक.*
*इंदापूर*:- *(दि.१)* साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे औचित्य साधत भिमाई आश्रमशाळेत नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकदिनाचे तथा स्वयंशासनाचे आयोजन केले होते.
मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट संचलित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेच्या वतीने आयोजित शिक्षकदिन तथा स्वयंशासन दिन कार्यक्रमात प्रत्यक्ष ४६ विद्यार्थी सहभागी झाले होते. मुख्याध्यापिका म्हणून कु.मयुरी गायकवाड (१२ वी विज्ञान) हिला मान मिळाला तर उपमुख्याध्यापक म्हणून रोहित घोडके तसेच शुभांगी जाधव, दीक्षा कडवळे, मानसी गायकवाड आदींसह ३८ विद्यार्थ्यांनी शिक्षक म्हणून, कु.माधुरी मोघे अधीक्षक.सेवक म्हणून सेवागिरी जाधव,अनिश जाधव यांनी यशस्वीरित्या जबाबदारी पार पाडली.
विद्यार्थ्यांनी प्रथमच शिक्षक व इतर भूमिका पार पाडत जबाबदारीने संपूर्ण दिवस शाळा सांभाळली. प्रत्यक्ष शालेय प्रशासनचा व अध्यापनाचा अनुभव घेता आला.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांना नेतृत्व गुण, शिस्त, जबाबदारी व शिकवणे या कलागुणांचा विकास होण्यास एक प्रकारे मदत झाली.
प्रत्यक्ष वर्गात अध्यापन, अध्ययन करताना कोणी अभ्यासाकडे लक्ष देतात का, शिक्षण प्रक्रियेत काही अडथळे निर्माण होत आहेत काय असे अनेक अनुभव या शिक्षकाच्या भूमिकेत काम करताना विद्यार्थ्यांना आढळून आले.
सदर कार्यक्रमाची संकल्पना प्राचार्या अनिता साळवे यांनी मांडली.शिक्षकांनी सर्वांच्या कामकाजाचे निरीक्षण करून योग्य परीक्षण केले .
समारोपात विद्यार्थ्यांनी आपले एक दिवसीय शाळा चालवण्याचे व अध्यापनाचे अनुभव सांगितले.
समारोपीय कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून प्राचार्या अनिता साळवे मॅडम तर प्रमुख अतिथी म्हणून मुख्याध्यापक साहेबराव पवार सर तसेच शिक्षक,अधीक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
या उपक्रमात सहभागी विद्यार्थ्यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. उपक्रमात सहभागी विद्यार्थ्यांचे संस्थेचे सचिव ॲड.समीर मखरे यांनी कौतुक केले.