shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

स्वातंत्र्य दिनानिमित्त अँग्लो उर्दू हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये विविध कार्यक्रम संपन्न...!!


विविध क्षेत्रातील मान्यवरांचा
 समाजरत्न पुरस्काराने सन्मान

अजीजभाई शेख / राहाता 
संगमनेर - देशभरात ७८ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असुन. १५ ऑगस्ट हा राष्ट्रीय सण देशात दरवर्षी उत्साहात साजरा केला जातो. महाराष्ट्र शैक्षणिक विभागाने १५ ऑगस्ट रोजी शाळांमध्ये घेण्यात येणाऱ्या  कार्यक्रमांसंदर्भातील निर्देश जाहीर केले होते. शालेय विभागाने जाहीर केलेल्या पत्रकामध्ये यासंदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली आहे.क्रांतीविरांनी देशासाठी दिलेल्या बलिदानाची आठवण विद्यार्थ्यांना व्हावी, त्यांच्यामध्ये राष्ट्रीय एकात्मतेची भावना निर्माण व्हावी या उद्देशाने राज्यातील शाळांमध्ये  विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्याचेच तंतोतंत पालन करत
या ७८ व्या १५ ऑगस्ट च्या निमित्ताने संगमनेर शहरातील नायकवाड जामा मस्जिद जवळील अँग्लो उर्दू हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये अंजुमन ए इस्लाम ट्रस्टच्या माध्यमातून १५ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी आठ वाजता राष्ट्रीय ध्वज तिरंगा झेंडा फडकवत सलामी दिली असून विविध उपक्रम राबविण्यात आले आहे.

 ज्यामध्ये विशेष NEET,JEE,AND,CET, Coaching Classes चे देखील उद्घाटनविविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये अंगलो उर्दू हायस्कूलचे चेअरमन गनीहाजी शेख यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे,यावेळी,११ वि, व १२ वी सायन्स अँग्लो उर्दू हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज मधे शिकलेले विध्यार्थी व ट्रस्ट च्या माध्यमातून कोचींग क्लासचे विध्यार्थी विध्यार्थीनी मग ते कोणत्याही, कुठल्याही ज्युनिअर कॉलेज चे असो अश्या विध्यार्थी किंवा विध्यार्थीनीने प्रवेश परिक्षेच्या माध्यमातून गवर्नमेंट इंजिनिअरींग कोलेजला किंवा गवर्नमेंट मेडीकल कोलेज फक्त (एम.बी.बी,एस.) साठी प्रवेश मिळवीला असेल अशा विध्यार्थी विध्यार्थीनींना प्रा.शमशुद्दीन इनामदार यांनी रू १० हजार ची मदत म्हणून घोषित केली आहे.सदरची मदत ही फक्त एक दोन नव्हे तर जितके विध्यार्थी या प्रक्रियेत प्रवेश घेतील त्या सर्वांना प्रती ऍडमिशन १०, दहा हजार रूपये मिळतील असे अवाहन केले आहे,तर अंगलो उर्दू हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या माध्यमातून १५ ऑगस्ट देशाच्या या सुवर्ण महोत्सवी सणानिमित्त विविध ऍडव्होकेट विद्यार्थी विद्यार्थिनींचे सन्मानचिन्ह देऊन मनोबल वाढवण्यात आले असुन,अँगल उर्दू हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना तसेच Ycmou, वाय सी एम ओ यु, व चित्रकला या स्पर्धेमध्ये प्रथम तसेच द्वितीय क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनींना रोख स्वरूपाचे बक्षीस शिक्षण संस्थेचे विश्वस्त चेअरमन शेख गनी हाजी यांच्या वतीने देण्यात आले आहे तसेच संस्थेचे विश्वस्त तथा कार्यक्रमास उपस्थित असलेल्या प्रमुख पाहुणे व इतर मान्यवरांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमानिमित्त आनंद साजरा करत विद्यार्थि व विद्यार्थिनींवरती रोख स्वरूपाच्या बक्षिचाचा वर्षा  केला आहे, 

यावेळी अंजुमन-ए-इस्लाम ट्रस्ट या संस्थेचे विशवस्त व अँग्लो उर्दु हास्कुल शालेय समिती सदस्य, श्री,चौधरी अब्दुल्ला हाजी हसन,चिफ ट्रश्टी, हाजी पठाण शौकत खान मोहम्मद खान,सचिव,शेख गणी हाजी सहाय. विश्वस्त व चेअरमन अँग्लो उर्दू हायस्कुल,शेख नजीर ताजमोहमंद,आत्मविश्वास, पठाण अय्युबखान हुसेनखान,आत्मविश्वास,हाजी शेख इजाज शमशुद्दीन आत्मविश्वास.शेख जमील फतेमहम्मद साहेब‌ आत्मविश्वास. हाजी शेख फजलोद्दीन कासम सर सदस्य शालेय समिती.तसेच अँग्लो ऊर्दू हायस्कुल अँड ज्युनिअर कॉलेजचे प्रध्यापक, शिक्षक  शिक्षका व कर्मचारी.सौ शेख रिजवाना फकीरमोहम्मद शेख मुनावर खलीलुर रहमान,सौ. शेख परवीन अय्युब, रहेमानी उबेदुर्रहमान कलीर्मुरहमान,  खान साजीद दिलावर. सय्यद मुश्ताक फखरेअलम,ओझे शेख बिस्मिल्ला जैनुद्दीन. खान रईसा इजाज. सय्यद नाजेमा शाहबाज. शेख शबाना सलीम,खान सफोरा मुनीर, शेख शबाना इब्राहिम. शेख नुजहत समीर, मनियार सलीम रमजु, पठाण नसरीनबानो मोहंमद जाकीर. शेख मजहर अहमद अय्युब, शेख तरन्न्नुम शब्बीर अली. शेख शाहिस्ता मुजीबुर रहमान,पटेल अमरीन मन्सूर,
 कुमारी खतीब सायका नौशाद. खान शिफा लियाकत. ​​शेख शिरीन बशीर. शेख बनपाशा रिझवान आदी मान्यवर प्रमुख पाहुणे विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते, अंजूमने ए इस्लाम ट्रस्ट संचलित अंगलो उर्दू हायस्कूलच्या या उपक्रमातून समाजाला एक नवी प्रेरणा,शिक्षणाची ऊर्जा मिळत असल्याने सर्वच स्तरातून अंजुमन ए इस्लाम ट्रस्टचे विश्वस्त मंडळ व अंगलो उर्दू हायस्कूलचे शिक्षक शिक्षका यांचे कौतुक केले जात आहे.
*वृत्त विशेष सहयोग
पत्रकार शौकत पठाण - संगमनेर 
*संकलन
समता न्यूज सर्व्हिसेस,
श्रीरामपूर -९५६११७४१११
close