shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

लाडक्या बाप्पाला वाजत गाजत निरोप...!गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या..!

एरंडोल: गेल्या दहा दिवसापासून शहरात सुरू असलेला गणेशोत्सवाचा जल्लोष व गुलालाची उधळण करून ढोल ताशांच्या निनादात मंगळवारी रात्री अठरा सार्वजनिक गणेश मंडळांनी कासोदा दरवाजा परिसरात अंजनी नदीपात्रात गणपती विसर्जन करुन बाप्पा ला निरोप देण्यात आला. 

लाडक्या बाप्पाला वाजत गाजत निरोप...!गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या..!

 मेनरोड परिसरात आबालवृद्धांची एकच गर्दी झाली होती. सायंकाळी शहरातील सर्व रस्ते मिरवणुकानी फुलून गेले होते बाळगणेश मंडळानी सकाळी चारचाकी हातगाड्यामधून मिरवणुका काढल्या दुपारी काही काळ ओस पडलेले एरंडोल शहरातील रस्ते सायंकाळी मिरवणुकीच्या गर्दीने फुलून गेले होते.

विसर्जन मिरवणुकीत १८ सार्वजनिक गणेश मंडळांनी सहभाग घेतला.सायंकाळी विसर्जन मिरवणुकीस प्रारंभ झाला. मिरवणुकीच्या अग्रभागी जयगुरू व्यायाम शाळेचा मानाचा गणपती होता.गणेश मंडळांचे कार्यकर्ते वाद्यांच्या तालावर थिरकत होते. अमळनेर दरवाजा,नागोबा मढी, मोठा माळी वाडा,मेन रोड,भगवा चौक मार्गे गणपती विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. दरम्यान मेनरोड वर सामाजिक कार्यकर्ते भगवान महाजन तसेच शिवसेना उ.बा.ठा गटाचे जिल्हा उपप्रमुख दशरथ महाजन यांच्या तर्फे गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. एरंडोल न.पा. तर्फे जून्या कार्यालयानजिक सर्व मंडळांच्या मुर्त्यांचे पुजन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आले.

    यावेळी उपविभागीय अधिकारी मनिषकुमार गायकवाड,नवनियुक्त तहसिलदार प्रदीप पाटील,नायब तहसीलदार संजय घुले, नगरपालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी किरण देशमुख, अरुण माळी,देविदास महाजन, डॉ.राहूल वाघ,शालिग्राम गायकवाड, न.पा.अधिक्षक विनोद पाटील,जगदीश ठाकूर, अमित पाटील,अभिजित पाटील, डॉ.सुरेश पाटील,गजानन पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

 कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस निरिक्षक सतीश गोराडे,स.पो.नि शंकर पवार,उपनिरिक्षक शरद बागल,विकास देशमुख,पो.कॉ.राजेश पाटील,अनिल पाटील, मिलिंद कुमावत,संदीप पाटील,गणेश पाटील यांनी चोख बंदोबस्त ठेवला. 



 





close