shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

लोकनेते शहाजीराव पाटील माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय बोराटवाडी मध्ये श्री गणेशाचे जल्लोष स्वागत.

  लोकनेते शहाजीराव पाटील माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय बोराटवाडी मध्ये श्री गणेशाचे जल्लोष स्वागत.                                       
इंदापूर: श्री गणेशोत्सवानिमित्त विद्यालयांमध्ये लाडक्या श्री गणेशाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी विद्यार्थिनींनी पारंपारिक वेशभूषा धारण करून, श्री. गणेशाचे औक्षण करत, रांगोळीच्या पायघड्या घालून,पुष्पृष्टी करत आपल्या लाडक्या बाप्पाचे मनोभावे स्वागत केले.
         यावेळी प्राचार्य  भीमराव आवारे  यांच्या मार्गदर्शनाखाली श्री गणेशाची प्रतिष्ठापना विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक  राजेंद्र रणमोडे यांच्या शुभहस्ते करण्यात आली. विद्यालयातील विद्यार्थिनींनी  वैभव सोलनकर,  सचिन भुजबळ, व मनीषा गायकवाड यांच्या मार्गदर्शनामध्ये अथर्वशीर्ष पठण केले. प्रसादाची व्यवस्था इयत्ता सातवीच्या वर्गाने वर्गशिक्षका श्रीपती वर्षा जगताप व  अनिल फडतरे यांच्या मार्गदर्शनामध्ये केली होती.
close