shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

ज्ञानसंपदा शाळेत आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण समारंभ संपन्न ...



प्रतिनिधी : संजय वायकर

 नगर : दि . 8 /  भारताचे माजी राष्ट्रपती तसेच आदर्श शिक्षक, शिक्षण तज्ञ डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती
गुरुवार दि . 5 सप्टेंबर 2024 रोजी ज्ञानसंपदा शाळेत शिक्षक दिन म्हणून साजरी करण्यात आली.


 जीवनामध्ये शिक्षकाचे स्थान अतिशय मोलाचे आहे, शिक्षक अज्ञानातून ज्ञानाकडे, अंधारातून उजेडाकडे, असत्याकडून सत्याकडे आपल्याला घेऊन जात असतो. याचे महत्त्व ओळखून या शिक्षक दिनी ज्ञानसंपदा शाळेत  प्रथम सत्रात  बाल कवयित्री  आपल्या भेटीला या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधण्यासाठी ज्येष्ठ बाल कवयित्री डॉक्टर संगीता बर्वे यांना निमंत्रित करण्यात आले होते. याप्रसंगी सुप्रसिद्ध संगीतकार व गायक श्री राजीव बर्वे, गायिका प्रांजली बर्वे उपस्थित होते, त्यांनी विद्यार्थ्यांशी अतिशय छान सुसंवाद साधून अनेक बालकवितांचे सादरीकरण केले.

 दुसऱ्या सत्रामध्ये शिक्षकांनी केलेल्या कार्याचा गुणगौरव, तसेच  प्रोत्साहन मिळावे म्हणून  श्री अरुण  कुलकर्णी यांच्या वडिलांच्या कै. विष्णुपंत कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ  तसेच संस्थेचे विश्वस्त  विजय प्रभाकर कुलकर्णी यांच्या बंधूच्या कै. संजय  प्रभाकर कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ नव्याने सुरू करण्यात आलेला 2023 24 या शैक्षणिक वर्षाचा ज्ञानसंपदा शाळेतील सौ. पूजा दिनेश भाटिया व श्री.कैलास सुदाम जाधव यांना ज्येष्ठ बालकवयित्री डॉक्टर संगीता बर्वे यांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला.

 प्रमुख पाहुण्या डॉक्टर संगीता बर्वे यांनी आपल्या मनोगतात शिक्षकांनी आपली प्रगल्भता वाढवण्यासाठी एक उत्तम वाचक व्हावे, उत्तम लेखन करावे व हाच आदर्श विद्यार्थ्यांमध्ये ही रुजवावा. जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची व लेखनाची आवड निर्माण होऊन त्यांच्यामध्ये राष्ट्रप्रेम, संस्कृती संवर्धन व जतन होऊन एक आदर्श विद्यार्थी निर्माण होईल. पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम, स्मृतिचिन्ह, व गौरव पत्र असे होते.

 सोहळ्यासाठी संस्थेचे उपाध्यक्ष श्री मिलिंदजी गंधे, मानद सचिव अरुणजी कुलकर्णी, स्कूल कमिटी चेअरमन कारभारी भिंगारे, खजिनदार अविनाशजी बोपर्डीकर, इत्यादी विश्वस्त उपस्थित होते.

सदर उपक्रमासाठी मार्गदर्शन करणारे व परीक्षण करणारे श्री. रवींद्र मुळे व पाऊलबुद्धे बी.एड.  कॉलेजच्या प्राध्यापिका सौ. अमृता रत्नपारखी यांनी उत्तम व पारदर्शकपणे परीक्षण केले. या उपक्रमासाठी व कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. शिवांजली अकोलकर तसेच सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले . विद्यार्थी व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
close