shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जामखेड येथे शालेय गुणवंत खेळाडूंचा सन्मान

जामखेड :-
 अखिल भारतीय भटके विमुक्त घुमंतु अदिवासी महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने रविवार दिनांक 29/09 2024 रोजी जामखेड  येथे तालुक्यातील खेळाडूंना  शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.

 यावेळी  कु. कोमल राजेंद्र डोकडे (बॉक्सिंग सिल्व्हर मेडल विजेती),  ची.रोहन रमेश धोत्रे (राज्यस्तरीय थांग था चॅम्पियन शिप कांस्यपदक विजेता),  कु. मोहिनी तात्यासाहेब शिरगिरे (बॉक्सिंग सिल्व्हर मेडल विजेती) या  सर्व विजेत्या  खेळाडूंचा सन्मान करण्यात आला  यावेळी जिल्हा अध्यक्ष श्री रमेश आण्णा धोत्रे , तालुका अध्यक्ष श्री नवनाथ जाधव, तालुका उपाध्यक्ष श्री मच्छिंद्र येवले, शहराध्यक्ष श्री मच्छिंद्र पवार, मा. नगराध्यक्ष श्री संदीप भाऊ गायकवाड, श्री सूरज डोके, श्री राजेंद्र डोकडे, कार्यक्रमाचे बीड जिल्हाअध्यक्ष श्री हनुमंत धनवटे, प्रमुख पाहुणे म्हणून भाऊ सासवडकर यांसह आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री गोवर्धन जाधव यांनी प्रयत्न केले.
close