shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

लाखेवाड़ी विद्या निकेतन फार्मसी कॉलेजच्या विद्यार्थ्यांची ''जे. जी. सी. फार्मास्युटिकल" ला भेट*

*लाखेवाड़ी विद्या निकेतन फार्मसी कॉलेजच्या विद्यार्थ्यांची ''जे. जी. सी. फार्मास्युटिकल" ला भेट*
इंदापूर: जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संचालित विद्या निकेतन कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी विटा (सांगली) येथील जे. जी. सी. फार्मास्युटिकल प्रा. लि.या नामांकित कंपनीला भेट देऊन औषधनिर्माणशास्त्राची माहिती करून घेतली. यात औषध निर्माण प्रक्रिया, यासाठी वापरले जाणारे विविध औषधे (API-Drug), गुणवत्ता चाचणी ( Qauality Assurance), गुणवत्तेवर नियंत्रण (Quality Control) व पॅकिंग संदर्भातची माहिती विद्यार्थ्यांनी जाणून घेतली. यावेळी प्रा. बन सर, प्रा. सुरवसे सर व प्रा. बोके मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण ४५ विद्यार्थ्यांनी या इंडस्ट्रिअल भेट दौऱ्यात सहभाग घेतला होता. 
या नावीन्यपूर्ण उपक्रम राबविल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष  श्रीमंत ढोले सर, उपाध्यक्षा सौ.चित्रलेखा ढोले मॅडम , सचिव  हर्षवर्धन खाडे, मुख्य सल्लागार  प्रदीप गुरव साहेब व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सम्राट खेडकर सर यांनी प्राध्यापक व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
close