shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

स्व.पत्रकार लक्ष्मण पवार यांच्या कुटुंबाला महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा आधार !

पत्रकार संघाच्यावतीने मदतीचा धनादेश
किराणा व शालेय साहित्याचे वितरण"

ठाणे / प्रतिनिधी 
ठाणे जिल्ह्याच्या मुरबाड तालुक्यातील मूळ रहिवासी आणि सध्या डोंबिवली येथे वास्तव्यास असलेले पत्रकार स्वर्गीय लक्ष्मण पवार यांचे नुकतेच हृदयविकाराच्या त्रिव झटक्याने दुर्दैवी निधन झाले. पवार यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. त्यांच्या राहत्या घराचे वर्णन केल्यास, ते पत्र्याच्या घरात राहत होते, हे त्यांच्या कठीण परिस्थितीचे प्रतिक होते.

लक्ष्मण पवार हे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे सदस्य नसतानाही, त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती अतिशय बिकट असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे यांना समजतात त्यांनी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस तथा  दैनिक समर्थ गावकरी चे संपादक डॉ.विश्वासराव आरोटे यांना त्यांच्या परिवाराची भेट घेऊन आर्थिक मदत करण्याचे सांगितले. यानंतर, त्यांनी संघाच्या वतीने पवार यांच्या कुटुंबियांना मदत करण्याचा निर्णय घेतला.
डॉ. विश्वासराव आरोटे आणि पत्रकार संघाचे काही पदाधिकारी पवार यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी डोंबिवली येथे जाऊन पवार कुटुंबातील सदस्यांचे सांत्वन केले आणि त्यांना मदतीचा धनादेश व किराणा साहित्य आणि मुलांच्या शालेय साहित्याचे वाटप केले. 
या प्रसंगी नवी मुंबई जिल्हाध्यक्ष दशरथ चव्हाण, पत्रकार विष्णू बुरे आदि उपस्थित होते.
कै. लक्ष्मण पवार यांच्या कुटुंबाला या मदतीमुळे काहीसा दिलासा मिळाला असून पत्रकार संघाच्या या कृतीने सामाजिक उत्तरदायित्वाचे उत्तम उदाहरण देखील घालून दिले आहे.

*संकलन
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - ९५६११७४१११
close