shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

खंडाळा येथे श्री दुर्गा माता दौड मोठ्या उत्साहात साजरी


श्रीरामपूर / प्रतिनिधी:
श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा येथे "श्री दुर्गा माता दौड" श्री शिव हिंदुस्थान प्रतिष्ठान खंडाळा  यांच्या वतीने अत्यंत उत्साहात साजरी झाली. शेवटच्या दिवशी "श्री दुर्गा माता दौड" कार्यक्रमाचा समारोप शानदार सांस्कृतिक कार्यक्रमाने झाला.खंडाळा गावात श्री दुर्गामाता दौड कार्यक्रम श्रीरामपूर विभाग अंतर्गत आयोजित करण्यात आली होती.

नवरात्री कालावधीत सलग ९ दिवस पहाटे ५:३० वा खंडाळा गावी प्रेरणा मंत्राचे सामूहिक पठण करण्यात आले.श्री दुर्गामाता,श्री तुळजाभवानी माता,श्री जगदंबा माता,श्री भारत माता आणि श्री छत्रपती शिवाजी महाराज व श्री धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा जय जयकार करत राष्ट्रभक्ती गीतांचे गायन करीत संपूर्ण गावाला प्रदक्षिणा घालून गावाचे ग्रामदैवत श्री म्हसोबा महाराज यांचे दर्शन घेऊन जगदंबा मातेच्या चरणी भारत मातेच्या अंतर बाह्य शत्रूंचा नाश करण्याची शक्ती अंगी यावी अशी विनवणी, प्रार्थना करण्यात आली.श्री दुर्गा माता दौड " चे  ठिकठिकाणी,जागोजागी अनेक माता-भगिनी कडून मनोभावे पूजन करण्यात आले. "श्री दुर्गामाता दौड" कार्यक्रमात अनेक नागरिक स्वयंस्फुर्तीने सहभागी झाले होते.

*संकलन
समता न्यूज सर्व्हिसेस,
 श्रीरामपूर - ९५६११७४१११
close