shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

मनोज दादा जरांगे-पाटील यांच्या समर्थनार्थ, प्रा. रामदास झोळ सरांचा विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल

प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

करमाळा: दि. २८/ करमाळा तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाबरोबरच ‌शिक्षण, आरोग्य, उद्योग तसेच रोजगार ‌ निर्मितीसाठी ‌विकासाच्या मुद्द्यावर विधानसभेची निवडणूक लढवणार असल्याचे प्रा. रामदास झोळ सर यांनी सांगितले आहे. मराठा संघर्ष योध्दा मनोज दादा जरांगे-पाटील यांच्या समर्थनार्थ  करमाळा विधानसभेची निवडणूक ‌ लढवणार ‌असुन, यासाठी सोमवार दिनांक २८ ऑक्टोंबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मराठा संघर्ष योध्दा मनोज दादा जरांगे-पाटील यांच्या मराठा समाजाच्या आरक्षणाच्या चळवळीत करमाळा तालुक्यातुन सुरुवातीपासून कार्यरत असून मराठा समाजाचे अनेक प्रश्न मार्गी लावण्याचे काम  केले आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढ्यात आपण स्वतः प्रत्यक्ष सहभागी होऊन मुंबई येथे झालेल्या आंदोलनासाठी ‌करमाळा तालुक्यातील समाज बांधवांना जाण्यासाठी १०० गाड्यांना पेट्रोल आणि डिझेलची सोय करून जेवणाची सोय केली होती. याचबरोबर सोलापूर येथे झालेल्या मराठा आंदोलनासाठी सोलापूर येथे जाण्यासाठी २५० गाड्यांना ‌ मोफत इंधन देण्याचे काम त्यांनी केले आहे. मराठा समाजाला इतर समाजाप्रमाणे शैक्षणिक सवलती ‌मिळाव्यात म्हणून मनोज दादा जरांगे-पाटील यांच्या ‌ नेतृत्वाखाली ‌मुला-मुलींचे मोफत शिक्षणाची मागणी ‌ शासनाकडे करण्यात आली होती. यामध्ये मुलींचे संपूर्ण शिक्षण मोफत झाले असून ‌ मुलांच्या शिक्षणाबाबत ‌ सवलती संदर्भात पाठपुरावा ते करीत आहेत. मराठा ओबीसी ‌ बहुजन समाजालाही ‌ इतर समाजाप्रमाणे शैक्षणिक ‌ शिष्यवृत्ती, वसतिगृह भत्ता मिळण्यासाठी ‌शासनाकडे त्यांनी मागणी केली होती. ती मागणी ही ‌ मान्य करण्यात आली. मराठा समाजाबरोबरच धनगर, ‌मुस्लिम ‌बहुजन समाजाला ‌शैक्षणिक समानतेच्या धोरणावर शासनाकडून सवलत मिळून घेण्याचे काम केले आहे. याचबरोबर करमाळा तालुक्यातील ‌ युवकांना ‌व्यावसायिक शिक्षणाची सोय करून रोजगार निर्मितीसाठी ‌नोकरी महोत्सवाच्या आयोजन करून अनेकांना रोजगार मिळवून देण्याचे काम केले आहे.

करमाळा तालुक्यामध्ये रस्ते, पाणी, वीज याचबरोबर शिक्षण, आरोग्य, रोजगार निर्मितीसाठी ‌काम करत असून विधानसभेची निवडणूक लढवत आहोत. मराठा बहुजन समाज बांधवांचा पाठिंबा मला ‌ मिळत असून, मराठा संघर्ष योध्दा मनोज दादा जरांगे-पाटील यांचा वरदहस्त आपणास लाभलेला आहे. करमाळा तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये मराठा समाजाचे योजना दुत सेवकांचे  २५०० फॉर्म नारायणगड येथे झालेल्या मराठा समाजाच्या दसरा मेळाव्याला जाण्यासाठी मराठा समाज बांधवांना प्रवासाची सोय मोफत करण्यासाठी ५०० गाड्यांना मोफत इंधन दिले असून, समाजाच्या कल्याणासाठी सर्वांगीण विकासासाठी काम करीत असल्यामुळे विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी आशीर्वाद दिला असल्याचे त्यांनी सांगितले आहे. करमाळा विधानसभा मतदारसंघासाठी होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी त्यांनी हा अर्ज दाखल केला आहे.

यावेळी त्यांच्या धर्मपत्नी दत्तकला शिक्षण संस्थेच्या सचिवा सौ. माया ताई झोळ मॅडम, शेतकरी कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष दशरथ आण्णा कांबळे, काँग्रेसचे आय चे जेष्ठ नेते जिल्हा संघटक हरीभाऊ मंगवडे, लालासाहेब जगताप सर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र गोडगे, चंद्रशेखर जगताप, तालुका अध्यक्ष सुदर्शन शेळके, सत्यवान गायकवाड रिधोरे, आजिनाथ परब तांदुळवाडी, संतोष बागल भोसरे, संतोष परबत कुर्डूवाडी, शिंदे चिंचगाव तसेच वाशिंबे गावचे माजी सरपंच अनुरथ झोळ, भगवान डोंबाळे,  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका उपाध्यक्ष सुहास काळे पाटील, भिमराव ननवरे, प्रा. राजेश गायकवाड, डाॅ. विशाल बाबर सर, संजय जगताप सर उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी अंजली मरोड यांनी हा अर्ज स्वीकारला. यावेळी दोनसहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी शिल्पाताई ठोकडे देखील उपस्थित होते.
close