shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

केज मतदारसंघात नमिता मुंदडा यांचे कमळ जोमात!!

प्रकाश मुंडे/बीड जिल्हा प्रतिनिधी:-

केज विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने आज भाजप महायुतीच्या उमेदवार सौ नमिता अक्षय मुंदडा यांनी कासारी, तरनळी, कोल्हेवाडी, नागझरी, काळूचीवाडी या गावांना भेटी दिल्या. या भेटीदरम्यान गावातील सर्व सामान्य मतदार बंधू-भगिनींशी संवाद साधला.



आपल्या महायुती सरकारचे गतकाळातील कामे व सर्व कल्याणकारी योजना डोळ्यासमोर ठेवून आणि केज परिसरातील विविध कामांचा संदर्भ घेत येत्या २० तारखेला मला आपले मतदानरुपी आशीर्वाद देऊन पुन्हा एकदा जनतेच्या सेवेची संधी द्यावी अशी विनंती केज मतदारसंघातील भाजप महायुतीच्या उमेदवार सौ नमिता अक्षय मुंदडा यांनी यावेळी केली.


या प्रसंगी भाजप महायुतीच्या उमेदवार सौ नमिता अक्षय मुंदडा यांच्या दौऱ्यात तमाम ग्रामस्थ, आजी-माजी सरपंच, ग्रा. सदस्य, सोसायटी चेअरमन, भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचे सन्माननीय पदाधिकारी व कार्यकर्ते  मोठ्या संख्येने उपस्थित होते.               एकंदरीतच सद्याचे केज मतदारसंघातील वातावरण पाहता भाजप महायुतीच्या उमेदवार सौ नमिता अक्षय मुंदडा यांचे निवडणूक चिन्ह कमळ जोमात आहे अशी मतदारसंघातून सगळिकडे चर्चा ऐकायला मिळत आहे.यामुळे भाजप महायुतीच्या उमेदवार सौ नमिता अक्षय मुंदडा यांचा विजय सोपा झाला आहे.

close