shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अय्युब पठाण यांना उत्कृष्ट साहित्य पुरस्कार


पैठण / प्रतिनिधी:
बुलढाणा जिल्ह्यातील साखरखेर्डा येथील भारत संग्राम आयोजित स्वर्गीय मधुकर खंडारे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ व सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने मराठवाड्यातील प्रसिध्द लेखक तथा कवी अय्युब पठाण लोहगावकर हे मागील ३५ वर्षापासून मराठी साहित्य क्षेत्रात मराठीमध्ये साहित्य लेखन करून साहित्य क्षेत्रात  त्यांनी भरीव योगदान दिले आहे. आणि अय्युब पठाण यांनी १३ पुस्तकांचे दर्जेदार लेखन करून समाजामध्ये आणि बालकांमध्ये प्रबोधनात्मक जनजागृती केली आहे.


 म्हणून या कार्याची दखल घेऊन सिंदखेड राजा तालुक्यातील साखरखेर्डा येथील भारत संग्रामचे मुख्य आयोजक सचिन खंडारे यांनी एक उत्कृष्ट साहित्यिक म्हणून अय्युब पठाण लोहगावकर यांना साहित्य क्षेत्रातील २०२४ चा अत्यंत सन्मानाचा उत्कृष्ट साहित्य लोकशाहीर अण्णाभाऊ साठे राज्यस्तरीय पुरस्कारासाठी  अय्युब पठाण यांची उत्कृष्ट साहित्य पुरस्कारासाठी  निवड करून त्यांना हा पुरस्कार जाहीर केला आहे. लवकरच मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार श्री. पठाण यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे.


संकलन
समता मीडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर - 9561174111
close